Advertisement

रेल येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

रेल येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

 चोहोटा बाजार :-अमोल रा.राणे
  रेल येथिल कोळी महादेव बांधवांच्या वतीने आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली यावर्षी आदिवासी कोळी महादेव जमातीचे जळगाव व अकोला जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणाकरिता बसलेल्या समाज बांधवांच्या मागण्या मान्य व्हाव्यात त्यांना पाठिंबा दर्शवत ही जयंती साजरी केली , घटनादत्त अधिकार असूनही कोळी महादेव जमातीला आरक्षणापासून वंचित राहावे लागते, हा सर्व प्रकार यावर्षी लक्षात घेता यावर्षी मिरवणूक वाद्य-वाजववू काढली नाही, जयंतीला उपस्थित सर्व आदिवासी कोळी महादेव जमातीच्या सर्व युवकांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र याविषयी मार्गदर्शन केले राज्यकर्ते कोळी महादेव जमातीवर किती अन्याय करते याची जाणीव करून दिली ,यावेळी दादाराव पेठे, शुभम लोणे, मोहन घुगरे, अक्षय सागोरकार, अंकुश सागोरकार, अक्षय ढोरे, शालिकराम तेलंग, ओमु झाडे, अनिकेत काळे, पूर्णाजी काळे,भास्कर कुरळकर, शिवा इंगळे, सुरेश घुगरे, बबनजी शास्त्री, गणेश इंगळे,अक्षय इंगळे, मंगेश डांगरे, सदाशिव कांडल कार, रवीभाऊ मेहंकार,ज्ञानू मोरे, हरिओम लोणे, गोपाल पायताळे, यावेळी महर्षी वाल्मिकी जयंती उत्सवाचे आयोजक सर्व पदाधिकारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता*

Post a Comment

0 Comments