चोहोटा बाजार :-अमोल रा.राणे
आद्यकवी महर्षी वाल्मिकी प्रतिष्ठान करतवाडी रेल्वे च्या वतीने जयंती साजरी करण्यात आली यावर्षी आदिवासी कोळी महादेव जमातीचे जळगाव व अकोला जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणाकरिता बसलेल्या समाज बांधवांच्या मागण्या मान्य व्हाव्यात त्यांना पाठिंबा दर्शवत ही जयंती साजरी केली , घटनादत्त अधिकार असूनही कोळी महादेव जमातीला आरक्षणापासून वंचित राहावे लागते, हा सर्व प्रकार यावर्षी लक्षात घेता यावर्षी मिरवणूक वाद्य-वाजववू काढली नाही, जयंतीला उपस्थित सर्व आदिवासी कोळी महादेव जमातीच्या सर्व युवकांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र याविषयी मार्गदर्शन केले राज्यकर्ते कोळी महादेव जमातीवर किती अन्याय करते याची जाणीव करून दिली , यावेळी महर्षी वाल्मिकी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता,
0 Comments