मागील दिवसांमध्ये अतिवृष्टी व ढगफुटी खडदगाव ,माळेगाव, लोणवाडी, पिंपळखुटा धांडे. येथील शेतकऱ्यांनी माननीय तहसीलदार साहेब नांदुरा यांना निवेदन देऊनही त्यांनी कुठल्याही प्रकारची मदत शेतकऱ्यांना दिलेली नाही.दिनांक 23/9/2023 रोजी रात्री अतिवृष्टी व ढगफुडी नंतर तीन ते चार दिवस हलका पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुस्कान झालेले दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास पावसाने पिकांना (पॅरलेस) सारखा झटका दिला. आणि हो त्याचे नव्हते झाले पूर्ण शेतकऱ्यांच्या आशा त्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्या आता पुढे नवीन संकट निर्माण झाले. जनावरे वाहून गेली जमीन खरडून गेली पिकाचे खूप नुस्कान झाले मुलांचे शिक्षण कसे होणार उदरनिर्वाह करण्याकरिता जवळ काही चुकले नाही हे वर्ष कसे काय निघणार असे असंख्य प्रश्न शेतकऱ्यांना डोळ्यासमोर दिसत आहे. त्याकरिता *महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका उपाध्यक्ष राजेश रामराव काळे उपोषणाला बसणार आहे तहसीलदार साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार 125 घर पडळझड, 76 जनावरे, पुराच्या पाण्यात वाहून गेली, 11 जनावरे मृत्यूमुखी पडली. तसेच शेतकऱ्यांच्या शेती करिता उपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेली व एक खूप मोठी अत्यंत महत्त्वाची म्हणजे शेतातून पिकलेला कष्टाचा घामाचा माल पावसाचे पाणी गावामध्ये सिरल्यामुळे पूर्ण खराब झाला कोमलल्यावस्थेमध्ये व भिजलेल्या अन्न धान्य इत्यादी वस्तूंमध्ये पूर्ण मालाचे नुकसान झाले. सर्व शेतकऱ्यांना लागलेली चिंता शासन आपल्या पदरात मदत कधी देईल . ज्यांचे घर पडले त्यांना निवाराची आशा शासन दरबारी राहील त्यांना शासन निवारा कधी देणार. जे जनावरे लापता आहेत त्यांचा शोध कधी व केव्हा सुरू होईल. तालुका कृषी अधिकारी यांनी भक्ती बद्दल काय भूमिका घेतली? वरील सर्व विषयांचे मौन कधी सुटणार? असे शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले आहेत.तरी वरील सर्व प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांना अतिवृष्टी व ढगफुटीमुळे झालेल्या नुस्कानाची भरपाई तात्काळ दिनांक 9/10/ 2023 रोजी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी अन्यथा दिनांक 10/10/2023 पासून माळेगाव गोंड येथे लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल व उपोषणादरम्यान उद्भवणाऱ्या संपूर्ण परिणामास शासन प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनामध्ये नमूद केले आहे
प्रतिलिपी
१) मा. मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई.
2) मा.जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा.
3)मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा.
4) मा.विठ्ठलरावजी लोखंडकार राज्य उपाध्यक्ष, मनसे
5 )मा.मदन राजे गायकवाड बुलढाणा जिल्हा अध्यक्ष, मनसे
6)मा.भागतभाऊ उगले नांदुरा तालुका अध्यक्ष, मनसे
0 Comments