Advertisement

बद्रीनाथ केदारनाथाचे अंकरा वर्षांच्या स्वाराने घेतले दर्शन

बद्रीनाथ केदारनाथाचे अंकरा वर्षांच्या स्वाराने घेतले दर्शन
 जळगांव जामोद - दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सखाश्री ग्रुपच्या माध्यमातून पितृपक्षा मध्ये देवदर्शनाला सखारामपुर (इलोरा) येथील ह.भ.प.तुकाराम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वरील सखाश्री भक्तांची वेगवेगळ्या तिर्थक्षेत्र साठी निघत असते.
चारधाम यात्रेला सुरुवात झाली तेव्हा पासून कु.स्वरा सप्नाली सुशिलराव देशमुख(पवार) देऊळगाव सा. ह.मु. वाघोली पुणे ही दरवर्षीप्रमाणे यंदाही केदारनाथ बद्रीनाथ दर्शना साठी गेली होती तेव्हा तीने गंगोत्री,यमुनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ दर्शन पायदळ चालत घेतले प्रत्येक ठिकाणी घोडा, डोली व्यवस्था असताना सुद्धा मागील वर्षी नेपाळ मधील पोखरा व इतर ठिकाणी स्वरा दर्शन व वेगवेगळ्या प्रेक्षणिय स्थळे पाहण्यासाठी सहभागी असते वरील यात्रेमध्ये अमरावती विभागातील व इतर जिल्ह्यांतील भक्तमंडळी असतात स्वराची चारधाम यात्रा या वर्षी बद्रीनाथ केदारनाथ दर्शन करुन संपन्न झाली.

Post a Comment

0 Comments