सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या मंडळांचा सत्कार संपर्क साधण्याचे आवाहन....*
प्रतिनिधी /अकोला. बाळासाहेब नेरकर
गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे नवरात्र उत्सव दरम्यान समाज उपयोगी उपक्रम राबवणाऱ्या मंडळांचा मानपत्र व संस्थेचा मनाचा पदक देऊन सत्कार.
उपविभागीय अधिकारी यवतमाळ प्रा संजय खडसे श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट वाणिज्य व्यवस्थापन शाखेचे प्रमुख डॉ. संजय तिडके तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सव दरम्यान अकोला शहरात मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येते यामध्ये रक्तदान शिबिर, रोगनिदान शिबिर,पर्यावरण जनजागृती,स्वच्छता अभियान असे विविध उपक्रम राबविले जातात.
यावर्षी गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक दायित्व जपणाऱ्या मंडळांचा गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने संस्थेचा मानाचा पदक व मानपत्र देऊन सन्मानित करण्याचे मानस आहे. त्याकरिता मंडळांनी नोंदणी दिनांक २१ ऑक्टोबर पर्यंत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
नोंदणी करण्यासाठी गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहन बुंदेले 9766513859,उपाध्यक्ष वैष्णवी आसेकर, सतीश अस्वार दिव्या चव्हाण,सुरभी दोडके, यांच्याशी संपर्क साधून माहिती द्यावी.
0 Comments