मलकापुर :- ४ ऑक्टोबर २०२३
देश सेवेत २८ वर्षे कार्य करून सेवानिवृत्त झालेले लेफ्टेनंट शेख मोहसीन शेख चाँद बागवान हे आपल्या गावी डोणगाव ता.मेहकर येथे जात असतांना रेल्वेद्वारे मलकापूर येथे उतरले असता त्यांचा मलकापूर बागवान बिरादरी तथा अनेकांकडून सत्कार करण्यात आला. डोणगाव ता.मेहकर येथील मूळ रहिवासी असलेले लेफ्टेनंट शेख मोहसीन शेख चाँद बागवान हे १९९५ मध्ये सशस्त्र सैन्यदलामध्ये दाखल झाले होते. त्यांनी तब्बल २८ वर्षे विविध ठिकाणी देशसेवेचे आपले कर्तव्य पार पाडले. ३० सप्टेंबर २०२३ रोजी सैन्य दलातून ते सेवानिवृत्त होऊन आपल्या मूळगावी डोणगाव येथे जात असतांना मलकापूर रेल्वे स्थानकावर ४ ऑक्टोबर २०२३ रोजी उतरले असता त्याठिकाणी त्यांचा मलकापूर बागवान बिरादरीसह आदींनी सत्कार केला. त्यानंतर सेवानिवृत्त सैनिक लेफ्टेनंट शेख मोहसीन शेख चाँद बागवान यांनी डोणगावकडे जात असतांना रेल्वे स्टेशन बाहेरील,
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले स्व.संजयसिंग राजपूत यांच्या समाधी स्थळावर जाऊन त्याठिकाणी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.यावेळी पोलीस कर्मचारी मंगेश चरखे,
पठाण,शेख रियाज शेख रशीद बागवान, असलमखाँ बागवान,शेख साबीर बागवान, शेख रहीम बागवान, कृष्णा फोटु स्टूडियोचे संचालक योगेशभाऊ शर्मा,
साईंदैनिक जनताधीश वृत्तपत्रचे संपादक
आबु बागवान, यांचेसह आदी उपस्थित होते.
0 Comments