दिनांक २ ऑक्टोबर गांधी जयंती पासून ते दी.८ पर्यंत राबविण्यात येणार! - समाजसेवक पुर्णाजी खोडके
हिवरखेड प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरातील सर्व ४० गावांमध्ये करतवाडी रेल्वे येथे रेल्वे ला थांब देण्यात यावा या मागणी करिता स्वाक्षरी अभियान सप्ताह दी .2 ऑक्टोंबर महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती पासून तर 8 ऑक्टोंबर 2023 पर्यंत संपूर्ण परिसरात गावागावात स्वाक्षरी अभियान राबवण्यात येणार आहे. या अभिमानामध्ये आपण सहभागी होऊन आपली सही व सहभाग नोंदवावी या मागणीला समर्थन द्यावे असे आवाहन समाजसेवक तथा रयत शेतकरी संघटना विदर्भ पश्चिम युवा अध्यक्ष पुर्णाजी खोडके यांनी परिसरातील जागरूक नागरिकांना केले. आहे. सविस्तर वृत्त असे की,चोहोट्टा बाजार हि जवळपास चाळीस खेड्यातील लोकांची मुख्य बाजारपेठ आहे. दैनंदिन कामकाजासाठी दररोज या खेड्यातील लोकांना चोहोट्टा बाजार येथे यावे लागत असते, किराणा माल,शेतिपयोगी अवजारे, कृषी निविष्ठा,दवाखाना, मेडिकल, भाजीपाला, दैनंदिन किरकोळ विक्रेते या सर्वच गोष्टी चोहोट्टा बाजार येथे याच रोडवर असल्याने वाहनांची, लोकांच्या गर्दीमुळे हा मुख्य रस्ता कायम गजबजलेला असतो.शालेय कामानिमित्त तसेच महसूल मंडळ असल्याने सरकारी कामांसाठी अकोट, अकोला जाने येणे आवश्यक असते.वरिल सर्वं बाबिचा विचार करता अकोट अकोला दरम्यान करतवाडी रेल्वे येथे २००१,२००२ साली रेल्वे ला थांबा मिळाला होता, व रेल्वे थांबत होती.हा थांबा महत्वाचा आहे. करतवाडी रेल्वे येथे रेल्वे ला थांबा देण्यात यावा या आधी या स्टेशनला रेल्वे थांबत होती परंतु रेल्वे विभागाने सदर थांबा कोणत्या कारणास्तव व का ? बंद करण्यात आला होता . तसेच रेल्वेला करतवाडी रेल्वे येथे थांबा मिळावा या मागणी करिता रेल्वेमंत्री मा.रावसाहेब दानवे, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, व लोकप्रतिनिधी व रेल्वे विभाग ,जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे,तरी २ ते ८ ऑक्टोंबर पर्यंत हे स्वाक्षरी अभियान
रयत शेतकरी संघटना, निर्भय बनो जणआंदोलन व या परिसरातील गावकऱ्यांच्या वतीने राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये सहभागी होऊन आपण आपली सही, पाठिंबा नोंदवावा असे आवाहन समाजसेवक पुर्णाजी खोडके रयत शेतकरी संघटना विदर्भ पश्चिम प्रभारी युवा अध्यक्ष यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
0 Comments