Advertisement

मराठा आरक्षण मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय ज.जा येथे बेमुदत साखळी उपोषण

मराठा आरक्षण मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव जामोद येथे बेमुदत साखळी उपोषण....
प्रतिनिधी
जळगाव जा. :-आज दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी सरसकट मराठा आरक्षण या मागणीसाठी मराठा भूषण श्री मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी जिल्हा जालना येथे सुरु केलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ व पाठिंबा दर्शविण्यासाठी सकल मराठा समाज जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

खरं तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ५८ मुकमोर्चे निघाले तसेच मधल्या काळात आंदोलकावर आरक्षणासाठी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले एवढं असूनही जर समाजाला आरक्षण मिळत नसेल तर अनेक तरुण भावांनी आरक्षणासाठी बलिदान दिले.

एवढ्या मोठ्या प्रमाणात आरक्षणासाठी लढा दिल्यानंतरही आज पर्यंतही मराठा समाजाला आरक्षण मिळाले नसल्याने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या भावनेचा उद्रेक होत आहे.


तरी  मराठा आरक्षणाची मागणी रास्त असून ही मागणी जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत आमचे बेमुदत साखळी उपोषण हे सुरूच राहणार असे मराठा बांधवांनी सांगितले या उपोषण स्थळी जळगाव जामोद तालुक्यातील बहुसंख्य सकल मराठा बांधव उपस्थित आहेत.

Post a Comment

0 Comments