चोहोटा बाजार :- अमोल रा राणे (सामाजिक बातमी )
महर्षि वाल्मिकी जयंती निमित्याने प्रतिमा देऊन जळगाव, अकोला जिल्हा येथे सूरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा समर्थन देत आदीवाशी कोळी दि.२८/१०
आदिवासी कोळी महादेव समाजाला विनाअट जातीचे प्रमाणपत्र मिळावे या प्रमुख मागणीसाठी समाजबांधव उमेश ढोणे यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांना आयुक्तांमार्फत प्रभारी विभागीय आयुक्त संजय पवार यांना सोबतच महर्षि वाल्मिकी जयंती चे निमित्याने महर्षि वाल्मिकी ची प्रतिमा निवेदना सोबत सादर करण्यात आले.महादेव कोळी समाजाला विनाअट जातीचे प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी आदिवासी कोळी महादेव समाजाच्या वतीने जळगाव, अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. या उपोषणाला जिल्ह्यातुन समर्थन देत असून अशाच प्रकारे आदिवासी कोळी महादेव समाजाचे राज्यभर आंदोलन करण्याच्या इशारा समाजबांधवांनी निवेदनातुन विभागीय आयुक्तांना दिला आहे. समाजाच्या या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याने आदिवासी कोळी महादेव समाजात असंतोष पसरला आहे. घटनादत्त संविधानिक अधिकार असूनही आदिवासी कोळी महादेव समाजाला संघर्ष करावा लागत असल्याची खंत व्यक्त होते . आदिवासी कोळी महादेव समाजाला जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र मिळावे तसेच आरक्षणाच्या सोयी-सवलती अडथळ्याशिवाय मिळाल्या पाहिजे या मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले. शिष्टमंडळात उमेश ढोणे, मनोहर बुध, कॅप्टन लक्ष्मनजी गाले,वंदना जामनेकर, गजानन कासमपुरे, गजानन चुनकीकर सहभागी झाले होते.
0 Comments