Advertisement

मराठा-कुणबी, कुणबी -मराठा जातीच्या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कागदपत्र, पुरावे सादर करावेत

मराठा-कुणबी, कुणबी -मराठा जातीच्या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कागदपत्र, पुरावे सादर करावेत
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी राजेश काळे
बुलडाणा, दि. १७ – मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. 
 त्यानुषंगाने, जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज आदी जुनी अभिलेखे समितीस सादर करता येणार आहेत. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडील विशेष कक्षात ते दि.२१ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत. 
त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी यासंदर्भात त्यांच्याकडे जुने अभिलेख उपलब्ध असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात जमा करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. 
*****

Post a Comment

0 Comments