Advertisement

टिपू सुलतान जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर मोठे उत्साहात संपन्न

टिपू सुलतान जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर मोठे उत्साहात संपन्न 
61 तरुणांनी रक्तदान करून टिपू सुलतान जयंती साजरी केली
हिवरखेड प्रतिनीधी बाळासाहेब नेरकर कडून
हजरत टिपू सुलतान एक योद्धा युवा मंच ही एक सामाजिक संस्था असून ही संस्था कधी वैद्यकीय शिबिरे आयोजित करून, कधी गरीब मुलींना त्यांच्या लग्नासाठी साहित्य खरेदीसाठी मदत करून, कधी दवाखान्यात तर कधी रक्तदान करून समाजासाठी योगदान देत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक देशातील वीर जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यामध्ये सर्वात अग्रगणी असणारे नाव म्हणजे शहीद ए वतन मिसाईल मॅन टिपू सुलतान. भारतीय संविधानाच्या महत्वाच्या शहिदांच्या यादीमध्ये टिपू सुलतान यांचे नाव लिहिलेले आहे. संपूर्ण भारत टिपू सुलतान यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो, याच दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन,हजरत टिपू सुलतान एक योद्धा युवा मंच यांनी सौंदळा शहर तालुका तेल्हारा मध्ये महा रक्तदान शिबिरचे आयोजित करण्याचे ठरवले19 नोव्हेंबर रोजी सकाळी टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून शिभीराची सुरुवात 
9 वर्षाच्या अब्दुल साद निरागस मुलाने टिपू सुलतानची वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले यावेळी हिवरखेड ,सौंदळा मधील युवकांनी तरुण व आलेले प्रमुख उपस्थित होते त्या अनुषंगाने सर्व नियोजन करून 19 तारखेला सकाळी 9ते संध्याकाळी 05 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. अकोला येथील बीपी ठाकरे या ब्लड बँक संस्थेचे सहकार्य घेण्यात आले 
हिवरखेड आणि सौंदळाचे युवक
मंडळींनी जबरदस्त उत्साह दाखवून जवळपास 61 रक्तदान देऊन टिपू सुलतान जयंती साजरी केली
या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अब्दुल साकिब, अजहर भाई, समद भाई,शेख आसीफ, शेख याकूब, मोबिन शाह, शेख यासीन, शेख समीर, राफिक शाह, इसुब पठाण, तोसिब सोदागर, शेख अफरोज, राजिक शाह, आली भाई, शाहरूख खान, सायद साकीब, नावेद भाई, शोहेब खान, अब्दुल दानिश या सर्वांनी आपले योगदान दिले

Post a Comment

0 Comments