Advertisement

बुलढाणा एल सीबी पथकाची वरली मटक्यावर कारवाई

बुलढाणा एल सीबी पथकाची वरली मटक्यावर कारवाई संग्रामपुर तालुक्यातील सोनाळा येथील घटना
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी
विशेष बातमी 
संग्रामपुर तालुक्यातील सोनाळा टाऊन जवळ सार्वजनिक जागेतएलसीबी पथक बुलढाणा यांनी दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.20ते5.40 वाजता वरली मटका रेट केली असता. 1405 रूपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला. पोहवा. राजेंद्र गंगाराम अंभोरे बुलढाणा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता सोनाळा टाउनवर रेट केली असता आरोपी प्रल्हाद दशरथ कोडलकर वय 47 वर्ष कडु महादेव सोळंके वय50 वर्ष सुरेश नामदेव उंडे वय 47 वर्ष हे पैशांच्या हार जितीने वरली मटका आकडे चा खेळ खेळतांना व खेळवितांना मिळून आल्याने त्यांच्यावर पोलिसांनी अ.प. नंबर 216/2023 कलम 12 नुसार गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून नगदी 1390 रुपये वरली मटका लिहिलेले चिठ्ठ्या तीन बॉल पेन किंमत पंधरा रुपये एकूण चौदाशे पाच रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यातत आला पुढील तपास ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेट कॉन्स्टेबल विनोद वानखडे करीत आहेत..

Post a Comment

0 Comments