Advertisement

कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर टाकले उकळते पाणी : महिला अटक

कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर टाकले उकळते पाणी : महिला अटक 
जळगाव जामोद प्रतिनिधी - कारवाईसाठी गेलेल्या जळगाव जामोद पोलिसांच्या अंगावर एका महिलेने उकळते गरम पाणी टाकल्याची घटना तालुक्यातील खांडवी येथे उघडकी झाली या प्रकरणी पोलिसांनी महिलेस ताब्यात घेतले असून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर घटना मुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
 जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी येथील रहिवासी अनंता जानकीराम सारोकार याच्या दुकानांमध्ये लताबाई सारोकार ह्या बेकादेशीरपणे प्रवेश करून त्यांच्या दुकानाला आतून लॉक लावून बेकायदेशीरपणे ताबा घेतला होता. याप्रकरणी अनंता सार्वकाऱ्यांनी जळगाव जामोद पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक इंगळे हे त्यांच्या कर्मचाऱ्यांसह खांडवी येथे सदर दुकानावर कारवाई करिता गेले असता लताबाई सारोकर यांनी दुकान उघडण्यास मनाई केली. यावेळी पोलिसांनी सदर दुकानाचा शटरचा लॉक वेल्डिंग कटरच्या सहाय्याने कापून दुकानाचे शटर उघडले असता लताबाई सारोकार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर गरम उकळते पाणी टाकले यावेळी पोलिसांनी सदर महिलेस ताब्यात घेऊन तिला दुकानाबाहेर काढले असता तिने महिला पोलीस कॉन्स्टेबल फाळके यांच्या हाताच्या मनगटावर चावा घेऊन त्यांना जखमी केले. व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पोलिसांनी पोलीस कॉन्स्टेबल मधुकर गणेश गाडे यांच्या फिर्यादीवरून लताबाई बळीराम सारोकार राहणार खांडवी यांच्या विरोधात कलम ३५३, ३३२, ५०६ भादविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments