Advertisement

मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ ज.जा येथे सुरु असलेल्या बेमुदत साखळी उपोषणात महिलांचा प्रचंड प्रतिसाद

मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जळगाव जामोद येथे सुरु असलेल्या बेमुदत साखळी उपोषणात महिलांचा प्रचंड प्रतिसाद 
प्रतिनिधी नागेश भटकर 
मनोज जरांगे पाटील याच्या उपोषणाच्या समर्थनार्थ जळगाव जामोद येथे सुरु असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सकल मराठा समाजातील आरक्षण मिळावे या मागणी साठी मोठ्या प्रमाणात महिला सहभागी होऊन मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला .
साखळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा तालुक्यातील बहुसंख्य सकल मराठा समाज उपस्थित होता .
मराठा आरक्षणाची मागणी जो पर्यंत पूर्ण होत नाही तो पर्यंत तालुक्यातील हे आंदोलन असेच सुरू राहील .
तरी शासनाने लवकरात लवकर मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करावी असे सकल मराठा समाजातील महिलांनी मागणी केली

Post a Comment

0 Comments