Advertisement

स्व.अजितदादा पवार यांच्या अस्थिंचे खामगावात भावपूर्ण वातावरणात दर्शन..साश्रृनयनांनी सर्व पक्षीयांनी वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली

*स्व.अजितदादा पवार यांच्या अस्थिंचे खामगावात भावपूर्ण वातावरणात दर्शन* 
*साश्रृनयनांनी सर्व पक्षीयांनी वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली*
खामगाव/(संतोष आटोळे)                         महाराष्ट्र राज्याच्या राजकीय,सामाजिक आणि जनमाणसावर अमिट छाप उमटविणारे महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते स्व.अजितदादा पवार यांचा अस्थिकलश दर्शनासाठी राज्यभरात नेण्यात येत आहे. मंगळवार दि.03 फेब्रुवारी 2026 रोजी स्व.अजितदादा पवार यांचा पवित्र अस्थि कलश बुलढाणा जिल्हयात आणण्यात आला. मेहकर,जानेफळ,देऊळगाव सार्कशा मार्गे खामगाव शहरात आगमन झाले असता गांधी चौक या ठिकणी  दादांचा अस्थिकलश नागरीकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला. याप्रसंगी ब्रम्हवृदांच्या उपस्थितीत मंत्रोपचार करुन माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा यांच्या हस्ते अस्थिकलशाचे पुजन करण्यात आले.यावेळी सर्व पक्षीयांची उपस्थिती होती. सर्व पक्षीयांनी सुध्दा पुजन करुन व पुष्प अर्पण करुन दादांच्या अस्थि कलशाचे दर्शन घेतले. आपल्या लाडक्या नेत्याचे अस्थिंचे दर्शन घेतांना अनेकजण भावुक झाल्याचे पहावयास मिळाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघाचे आमदार मनोजभाऊ कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील,शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके, जी.एम.काकडे हे दुपारी 3 वाजुन 50 मिनीटांनी अस्थिकलश घेवुन खामगाव शहरात आले असता माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा यांनी अस्थिकलश स्वीकारुन कैलासवासी अजितदादांच्या प्रतिमेसमोर ठेवत पुष्प वाहुन अस्थिकलशाचे दर्शन घेतले. कार्यक्रम स्थळी स्व.अजितदादांच्या एआय प्रणालीने तयार करण्यात आलेल्या अजितदादांच्या आवाजाचे संवाद एैकतांना उपस्थित लोकप्रतिनिधी,पदाधिकारी व कार्यकर्ते भावनिक झाले होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार नानाभाऊ कोकरे,महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस डॉ.तब्बसुम हुसैन,सौ.सुरजितकौर सलुजा,भाजपचे नगरसेवक  तथा माजी न.प.उपाध्यक्ष मुन्नाभाऊ पुरवार,नगरसेवक प्रविण कदम, नगरसेवक कृष्णा ठाकुर, माजी नगरसेवक तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे किशोरआप्पा भोसले,बबलु पठान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी नगराध्यक्ष गणेशभाऊ माने,बाजार समितीचे संचालक अशोक हटकर, वंचित बहुजन आघाडीचे संघपाल जाधव,शांताराम पाटेखेडे, राजेश हेलोडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष संजय बगाडे, संघटक संभाजीराव टाले,बाजार समितीचे संचालक संजय झुनझुनवाला,प्रमोद चिंचोलकार,काँम्रेड नेते डॉ.विप्लव कविश्वर, पत्रकार संघटनेतर्फे प्रशांत देशमुख,मनोज नगरनाईक,ईश्वर ठाकुर,नानाभाऊ हिवराळे,सचिन बहुरुपी,खरेदी विक्री संघातर्फे गोपाळराव चव्हाण, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख श्रीराम खेलदार,ओबीसी संघटनेचे सुरज बेलोकार, वकील संघटनेतर्फे ॲड.टी.एम.हुसैन,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बुलढाणा सेवादलाचे जिल्हध्यक्ष देवेंद्रदादा देशमुख,ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख,तालुका अध्यक्ष मनोज वानखडे,शहरअध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरअध्यक्षा सौ.शारदाताई शर्मा, खामगाव विधानसभा प्रमुख पुंजाजी टीकार,माजी जि.प.सदस्य श्रीकृष्ण धोटे, जयराम मुंडाले,बाजार समितीचे माजी सभापती सुभाष पेसोडे, महेंद्रसिंग राठोड, शिवाजीराव पांढरे, तुषार चंदेल, अनंता माळी, संतोष महातो, आकाश खरपाडे,निलेश गव्हाळ,डॉ.आकाश इंगळे,रोहित राजपुत,शेगाव पंचायत समितीचे माजी सभापती भाऊराव शेजोळे, पुरुषोत्तम शेजोळे,मोहन परदेसी,अशोक देशमुख,प्राध्यापिका सौ.विद्या बुरुंगी,नगरसेवक तहेसीन शाह, मोहम्मद सहेलीम, अजीम कुरेशी,काकु पठान,आबीद उलहक,मुकदद्र खान,एजाज देशमुख,केशव कापले,मुन्ना बोंद्रे,महानंद यादव,दिलीप पाटील,सलीम पत्रकार,अभय गोडबोले, मयुर सातव,विठठ्ल धानोरे,राणा लकी सानंदा एज्यु.शाळेचे मुख्याध्यापक, विद्यार्थी व शिक्षक वृंद यांच्यासह खामगाव शहरातील विविध सेवाभावी संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरीकांनी स्व.अजितदादांच्या अस्थिंचे दर्शन घेतले.यावेळी दोन मिनीटे मौन पाळुन स्व.अजितदादांना सर्वपक्षीय श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अमर रहे-अमर रहे स्व.अजितदादा अमर रहे, जब तक सुरज चाँद रहेंगा अजितदादा पवार का नाम रहेंगा अश्या घोषणा देण्यात आल्या. संचालन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी पसायदान होवुन स्व.अजितदादांचा अस्थिकलश शेगाव येथील पुर्व नियोजित कार्यक्रमासाठी नेण्यात आला.

Post a Comment

0 Comments