*सक्षम-खामगाव द्वारा आयोजित खामगाव येथील ' मूकबधिर निवासी विद्यालय ' येथे नेत्र तपासणी शिबीर व चष्मे वाटप कार्यक्रम संपन्न.*
कार्यक्रमाला तालुका संघचालक श्री संतोषबाप्पू देशमुख यांची उपस्थिती
खामगांव/(संतोष आटोळे)
दिनांक 31 जानेवारी 2026 ला सक्षम-खामगाव द्वारा आयोजित, मूकबधिर निवासी विद्यालय येथे नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिराचा समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला.सक्षम हा एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा कार्याचा एक आयाम असून दिव्यांग क्षेत्रात कार्यरत आहे.
सक्षमच्या आवश्यक कार्यक्रमातील एक कार्यक्रम ,२८ डिसेंबर च्या जागतिक दिव्यांग सशक्तीकरण दिवसानिमित्त सक्षम द्वारे आयोजित मूकबधीर विद्यालय येथे नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले होते.या शिबिरात, अंदाजे 600 विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात येऊन, चष्म्याचा नंबर निघालेल्या एकूण 30 विद्यार्थ्यांना आज शिबिराच्या समारोपप्रसंगी चष्मे वाटप करण्यात आले.
यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, खामगाव तालुका संघचालक श्री. संतोष बाप्पू देशमुख हे होते.त्यांनी या वेळी,संघाच्या शताब्दी वर्ष निमित्त सुरू असलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली.
सक्षमचे खामगाव नगर अध्यक्ष प्रा. मेंडोले सर यांनी सक्षमच्या कामाची माहिती दिली संबंधित विषयाला धरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सक्षम कार्याध्यक्ष ॲड. शेखरभाऊ जोशी यांनी, येणाऱ्या काळात सक्षम द्वारा होण्याऱ्या कार्यक्रमाची मांडणी करून दिव्यांगांसाठी सक्षम सदैव तत्पर राहील असे सांगितले. यावेळी सक्षम उपाध्यक्ष आशिष जी सराफ यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची माहिती दिली. त्यानंतर शाळेचे प्राचार्य आणि सक्षमचे श्रवण बाधित प्रकोष्ठाचे विदर्भ प्रांत प्रमुख जगताप सर यांनी सक्षम च्या सर्व टीम चे आभार मानून मार्गदर्शन केले. यावेळी नगर परिषद खामगावचे नवनिर्वाचित नगरसेवक श्री. कृष्णाभाऊ ठाकूर यांनी आजच्या कार्यक्रमात आर्थिक मदत केली आणि कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. या नेत्र तपासणी शिबीरातील सर्व विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी ही मोहनराव नारायण नेत्रालायचे पी. आर. ओ. श्री विठ्ठल जी सोनाग्रे , व डॉ साबळे मॅडम यांनी केली. सक्षम कोषाध्यक्ष मुन्ना दादा कस्तुरे व सहकोषाध्यक्ष हेमंत दादा खेकाळे या कार्यक्रमाला उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सक्षम उपाध्यक्ष श्री जयंतराव कुलकर्णी तर आभार प्रदर्शन सक्षम सचिव अमित जोशी यांनी करून कार्यक्रमाचा समारोप झाला.
0 Comments