*धनगर समाज महासंघाचे माजी प्रदेशाध्यक्ष श्री. श्रीरामजी पुंडे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित*
राजमाताअहिल्यादेवी वैदर्भीय समाज ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने आयोजित जीवन गौरव सन्मान सोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात तसेच उत्साहात पुणे येथे पार पडला.
श्रीरामजी पुंडे यांचे सामाजिक कार्य पाहता तसेच युवकांसाठी ते एक प्रेरणास्थान असून त्यांच्या माध्यमातून सदैव सामाजिक कार्य ते करीत असतात. श्रीरामजी पुंडे हे नेहमीच सामाजिक,शैक्षणिक तसेच सहकार क्षेत्रात अग्रेसर असतात.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धनगर समाज महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष शरदभाऊ वसतकार तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राज्य वैचारिक प्रबोधन मंचाचे प्रमुख रामभाऊ मुळे, पुण्याचे आमदार महेशजी लांडगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य हेमंतजी हरहरे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक नितीनजी आप्पा काळजे यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन बोंद्रे यांनी तर सूत्रसंचालन गणेश पुंडे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन दिलीप सोनोने यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता ट्रस्टच्या कार्यकारिणीने अथक परिश्रम घेतले.
0 Comments