Advertisement

जळगाव जामोद पोलिसांची मोठी कारवाई; जुगार अड्ड्यावर छापा टाकून १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त...

*जळगाव जामोद पोलिसांची मोठी कारवाई; जुगार अड्ड्यावर छापा टाकून १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त...*

​जळगाव जामोद(प्रतिनिधी):

तालुक्यातील जमजम नगरच्या पाठीमागील शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर जळगाव जामोद पोलिसांनी रविवारी, १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी धाड टाकली. या कारवाईत ५ आरोपींना अटक करण्यात आली असून, रोख रकमेसह चार दुचाकी असा एकूण १ लाख ३५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जमजम नगर परिसरातील एका शेतात काही लोक 'एक्का-बादशहा' नावाचा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख इरफान आणि त्यांच्या पथकाने पंचासमक्ष या ठिकाणी छापा टाकला. यावेळी आरोपी पैशाच्या हार-जितीवर जुगार खेळताना रंगेहाथ मिळून आले.या कारवाईत सुरेश संपतराव राऊत (रा. खेडा वेस), लाईक अहमद अनिस अहमद (वय ३४, रा. तलावपुरा), मुमताज खान समशेर खान (वय ६०, रा. तलावपुरा), सनाउल्ला खान बिस्मिल्ला खान (वय ६०, रा. काजीपुरा) आणि इकरामोद्दीन इसामोद्दीन (वय ३८, रा. खेर्डा वेस) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्यांच्यासोबत इतर ३ ते ४ इसमही या जुगारात सामील असल्याचे निष्पन्न झाले आहे.पोलिसांनी घटनास्थळावरून आणि आरोपींच्या अंगझडतीतून एकूण ५,७५० रुपये रोख, ५० रुपये किमतीचे ५२ ताश पत्ते आणि सुमारे १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या ४ मोटार सायकली (एम.एच. २८ ए.डब्ल्यू. ४७५५, एम.एच. २८ ए.वाय. ४२६७, एम.पी. ०९ एम.डब्ल्यू. ०३५९ आणि एम.एच. २८ ए.एक्स. २२६६) असा एकूण १,३५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हा (रजि. नं. ७५/२०२६) दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ही कारवाई ठाणेदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख,दीपक निकम, प्रफुल्ल डब्बे, संदीप रिंढे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली.

Post a Comment

0 Comments