खामगाव (उमाका), दि. 30 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच हुतात्मा दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतींना खामगाव तहसील कार्यालयात मौन पाळून अभिवादन करण्यात आले.यावेळी तहसीलदार सुनील पाटील, नायब तहसीलदार शिरीष वसावे, नायब तहसीलदार निखिल पाटील, नायब तहसीलदार अभिजित जोशी यांच्यासह तहसील कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी महात्मा गांधी यांच्या विचारांना उजाळा देत हुतात्म्यांच्या त्यागाला श्रद्धांजली अर्पण केली.
0 Comments