Advertisement

युग धर्म पब्लिक स्कूलमध्ये तीन दिवसीय स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*खामगांव/(संतोष आटोळे)

*युग धर्म पब्लिक स्कूलमध्ये तीन दिवसीय स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
खामगांव/(संतोष आटोळे)
     युग धर्म पब्लिक स्कूल, खामगाव येथे तीन दिवसीय स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडले. या स्नेहसंमेलनाची सुरुवात २४ जानेवारी रोजी झाली. उद्घाटन समारंभात विद्वान मार्गदर्शक श्री अनिल जी नावंदर, सचिव महाराष्ट्र केमीस्ट अँन्ड ड्रगीस्ट असोसिएशन, श्री . प्रकाशचंद्रजी केडिया संचालक शिवांगी बेकर्स खामगाव.  श्री .गोपालजी अग्रवाल व प्राचार्य श्री. अनिरुद्धजी अवचार सर यांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. उद्घाटन शुभारंभ झाल्यानंतर (ग्रँड पेरेंट्स) आजी आजोबा पालक यांच्या मनोमिलनासाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये पालकांची व आजी-आजोबांची सहभाग घेण्याचीउत्कंठा शिगेला पोहोचली होती सर्वांनी खेळांमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर आनंद मेल्याचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी बनवलेले वेगवेगळे व्यंजन ची दुकाने लावून शिक्षणासोबतच त्यांना व्यवसाय कसा करावा हा त्यामागचा उद्देश आणि विशेष म्हणजे शाळेने विद्यार्थ्यांकडून कोणतेही प्रकारचे चार्जेस घेतले नाही 25 तारखेला सकाळी प्रि प्रायमरी व प्रायमरीविद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते दुपारी  ४ते ९या वेळेत आयोजित आनंद मेल्यामध्ये पालकांनी व मुलांनी मन मुराद आस्वाद घेतला.सुरेख संचलन सपना रेठेकर व स्वप्ना चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन अंकिता मॅडम यांनी केले. 


दुपारी 
 ४ ते रात्री ९ या वेळेत 
२५ जानेवारी रोजी सकाळी नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा मध्ये सहभागी होऊन  नंबर पटकावले संध्याकाळी६वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यामध्ये गाणी, नृत्य, नाटिका, योगा, आजी-आजोबांसोबत नृत्य अशा विविध कला प्रकारांनी कार्यक्रम रंगला. यावेळी शिक्षणासोबत संस्कृतीची जपवणूक परिवारासोबत कशी वागणूक करावी हे शिकवल्या गेले. यावेळी अग्रवाल परिवाराचे प्रमुख श्री .बाबूलालजी अग्रवाल व संपूर्ण अग्रवाल परिवार, तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन विद्यार्थिनी कु.यादवी जोशी व प्राचार्य श्री .अनिरुद्ध अवचार सर यांनी केले.
२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त अध्यक्ष श्री गोपालजी अग्रवाल, यांच्या शुभहस्ते तिरंगा फडकवून मानवंदना देण्यात आली संचालक श्री गोविंद  चुडीवाले श्री. संतोषजी डिडवाणीया जिल्हाध्यक्ष भाजपा व्यापारी संघ श्री. राजेश जी झापर्डे अध्यक्ष विश्व हिंदू परिषद, प्राचार्य श्री. अनिरुद्ध सर यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. माता सरस्वतीचे पूजन करून राष्ट्रगीतावर कवायत सादर करण्यात आली. यानंतर सोनाली नगरे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी “हर करम अपना करेंगे ए वतन तेरे लिये” हे देशभक्ती गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला. मान्यवरांच्या शुभहस्ते स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले . तसेच पालकांना व आजीआजोबांचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. यावर्षीचा स्टुडंट् आ्फ द इयर वर्ग १० वी चा विद्यार्थी कृष्णा सुभाष सुलताने याला देण्यात आला. शाळेतर्फे विद्यार्थी व पालकांसाठी व संपूर्ण स्टाफ साठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते .शेवटी सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला.
प्राचार्य श्री अनिरुद्ध अवचार सर आणि  गॅदरिंग इन्चार्ज सौ. रूपाली राठी  सौ.अंकिता राठी तसेच श्री शिवाजी सर कु. कांचन लोखंडे सौ. संगीता देशमुख सौ.रेखा राऊत सौ.कलपना वानखेडे सौ. पायल घडीनकर कु.रेखा तायडे सौ. नीलिमा सारडा सौ. सोनाली नगरे सौ.स्वप्ना चव्हाण  श्री. माधव सर श्री.विशाल राठोड सर कु. पुजा तायडेजिया मतांनी सौ. सोनम  सातपुते व , शिक्षकवृंद, कर्मचारी वृंद विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या परिश्रमातून हे स्नेहसंमेलन यशस्वी झाले. अनेक पालकांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक करत सकारात्मक अभिप्राय नोंदविला.

Post a Comment

0 Comments