प्रतिनिधी तेल्हारा बाळासाहेब नेरकर
शिक्षण संघर्ष संघटना तेल्हारा तालुक्याच्या वतीने जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.2005 पूर्वी अंशतः अनुदानित शाळेवर कार्य करणाऱ्या शिक्षकांना शासनाने जुनी पेन्शन योजना नाकारली असून ती जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्यात यावी यासाठी शिक्षक संघर्ष संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.पेन्शन ही म्हातारपणाची काठी असून जर तीच मोडून काढली तर शिक्षकांनी जगावे कसे हा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे. पेन्शन ही एकप्रकारची सुरक्षितताच असते.सेवानिवृत्तीच्या कालावधीतच व्यक्तीला वेगवेगळे आजार जुळतात.अशा वेळेस पेन्शन नसले तर खर्च कोठून करावा असे अनेक प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण होणार असून त्यासाठी जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्यात यावी या हेतूने शिक्षण संघर्ष समितीचे तेल्हारा तालुकाध्यक्ष विलास घुंगड,यांच्यासोबत मनोज बगले,वसंत गतमने,सैय्यद सर,राजेश टाले,सौ.अर्चना धनभर मॅडम,सौ.निलिमा इंगळे मॅडम इत्यादी शिक्षण संघर्ष समितीचे शिक्षक उपस्थित होते,
0 Comments