Advertisement

रोजगार हमी योजनेवर मजुरी करणाऱ्या महिलांची साळी चोळी व पावनचार देऊन भाऊबीज साजरी

रोजगार हमी योजनेवर मजुरी करणाऱ्या महिलांची साळी चोळी व पावनचार देऊन भाऊबीज साजरी 
प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर कडुन
अकोला.येथील सामाजिक वनीकरण विभाग , परिक्षेञ अकोला यांच्या अंतर्गत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरी करणाऱ्या सर्व महिला मजुरांची भाऊबीज वनपरिक्षेत्र अधिकारी माननीय संदीप शिरसाट यांच्या संकल्पनेतून व सहकार्याने सामाजिक बांधिलकी जपत आपल्या परिसरात मजुरीकाम करीत असलेल्या महिलांना साडी,चोळी, गोड पावनचार देऊन भाऊबीज डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिका लोणी अकोला येथे साजरी करण्यात आली .यावेळी समाजसेवक मराठायोद्धा गजानन हरणे यांच्या अध्यक्षते खाली व शुभहस्ते व प्रमुखउपस्थितीत प्रा. शिवचरण शिरसाठ, प्रा. विलास वानखडे, डॉ.कृष्णकात वक्टे, संदीप शिरसाट वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग अकोला, डॉ.दिलीप वाघमारे, श्रीकृष्ण रजाने या सर्व मान्यवरांच्या उपस्थिती साडी चोळी, गोड भोजनांचा पावन चार देऊन व साळी चोळी वस्तूचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत हा आगळावेगळा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला या परिसरातील सर्व मजूर वर्ग तसेच सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र अकोला येथील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माननीय संदीप शिरसाट आपली नोकरी सांभाळून ही सामाजिक बांधिलकी ठेवून दरवर्षी आपल्या विभागात काम करीत असलेल्या मजुरी करणाऱ्या महिलांची भाऊबीजच्या निमित्त त्यांना गोडधोड पांऊचार देऊन साडी चोळी देऊन त्यांची भाऊबीज साजरी करीत असतात. त्यांच्या या सामाजिक योगदानाबद्दल त्यांचे समाजसेवक गजानन हरणे यांनी कौतुक करून अभिनंदन करीत आभार मानले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता शरद महाकाल, किसनराव लाजूरकर, सुमित मंगलकार, विकी इंगळे, निवृत्ती काळे आदीनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगतात वनभोजनाने करण्यात आली.

Post a Comment

0 Comments