Advertisement

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टीप्पर ची मोटर सायकला धडक 17 वर्षीय तरुणी ठार

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टीप्पर ची मोटर सायकला धडक 17 वर्षीय तरुणी ठार 
शेगाव प्रतिनिधी
शेगाव ,29/12/2023रोजी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार १७ वर्षीय तरुणी घटना स्थळा वरच ठार झाल्याची घटना , २९ डिसेंबर रोजी कालखेड जवळ शेगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शेगाव तालुक्यातील भोनगाव येथील प्रशांत विलासराव शेळके हे त्यांच्या गौरी नामक पुतणिला, घेऊन घरी शेगाव जात होते. कालखेड नजीक अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टीप्पर,भरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात 17 वर्षीय मुलीच्या अंगावरून त्या वाहनाचे दोन्ही चाके गेल्याने मुलगी जागीच मृत्यू झाली. माहीती मिळताच शेगाव पोलीस स्टेशन च्या ताफ्याने घटनास्थळी धाव घेतली व माहीती घेऊन पंचनामा केला व मुत्काला शासकीय दवाखान्यात रवाना केले व पडुन गेलेल्या चालक व वाहन याचा तपास लावुन विक्की संजय गोरले वय 23 वर्ष राहणार लोहारा यांच्या सह गाडी क्रमांक MH,28, BB,2440ला ताब्यात घेऊन याच्या विरुद्ध गुन्हा 279/304/(A) , भादंवि 134/177,5/181दाखल केले आहे पुढील तपास PSI शिंदे साहेब हे करीत आहेत,हा अपघात झाल्याचे कारण, शिवसेना शिंदे गटातील श्री अजय दादा अहीर आक्रमक भुमिकेत पत्रकारांशी बोलताना सांगितले की जे अवैध रेती चे गाड्या बिना नंबर चे चालत आहेत,त्यांच्यवर का गुन्हे दाखल करण्यात येत नाही,माफिया पूर्ण पणे बुलढाणा जिल्ह्या मध्ये जो पर्यंत बंद होत नाही जे म्हणजे व्यवसाय म्हटल्या जाईल प्रशासनाचा, पोलीस स्टेशन, तहसीलदार, पांडेबोआ ,जेवढे प्रशासन आहे हे सर्व चे सर्व मेन मॅनेज झाले आहे त्यांना होणाऱ्या ही त्यांना कोणाची काहीही अर्था अर्थी संबंध राहत नाही पैसा घ्या आणि काम करून घ्या अशा प्रकारातून म्हणतो जो पर्यंत रेती बंद होतं नाही आम्ही पूर्ण तालुक्यातील रेती बंद करू येणाऱ्या दोन दिवसात रेती माफिया बंद झाले नाही तर आम्ही ताळपोळ तोडफोड करू प्रशासन शी जे काही होईल ते आम्ही बघून घेऊ असे आव्हान अजय अहिर शेगाव शिंदे गट किसान सेना शेगाव तालुका प्रमुख यांनी सांगितले,

Post a Comment

0 Comments