Advertisement

मॉडेल करियर सेंटर च्या रोजगार मेळाव्याला लाभला प्रचंड प्रतिसाद ,११७ उमेदवारांच्या मुलाखती तर 23 उमेदवारांना दिले जागेवर ऑफर लेटर

मॉडेल करियर सेंटर च्या रोजगार मेळाव्याला लाभला प्रचंड प्रतिसाद ,११७ उमेदवारांच्या मुलाखती तर 23 उमेदवारांना दिले जागेवर ऑफर लेटर
बुलडाणा : प्रतिनिधी
आज दिनाक 29 डिसेंबर 2023 रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र अंतर्गत मॉडेल करियर सेटर, बुलढाणा तसेच माणुसकी फाउंडेशन, मलकापुर आणि जनता कला वाणिज्य महाविद्यालय, मलकापुर यांच्या सयुक्त विद्यमानाने प्लेसमेट ड्राइव चे आयोजन करण्यात आले होते. सदरील प्लेसमेंट ड्राइव मधे नामांकित क्षेत्रातील पुणे, नागपुर , बुलढाना येथील उदयोजक मुलाखती घेण्याकरिता उपस्थित होते. यामध्ये त्यांनी एकूण ११७ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या त्यापैकी ४१ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली तर 23 जणांना जागेवर ऑफर लेटर देण्यात आले. 

जिल्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करियर सेंटर बुलडाणा यांचे मार्फत रोजगार मेळाव्याचे / प्लेसमेंट ड्राईव्ह चे दर महिन्याला आयोजन करण्यात येते.
     याच प्लेसमेंट ड्राईव्ह द्वारा मलकापूर तालुक्यातील गरजू उमेदवारांना नोकरीच्या संधी प्राप्त करून देण्याकरिता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर बुलढाणा चे रोजगार मेळावा प्रमुख श्री राहुल सुरडकर, मॉडेल करिअर सेंटर चे यंग प्रोफेशनल श्री योगेश लांडकर, जनता कला महाविद्यालय मलकापूर चे प्राचार्य डॉ श्री चव्हाण , प्लेसमेंट कक्षाचे श्री मोरे व माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन चे अध्यक्ष श्री विवेक राजापुरे तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेची माहिती देण्याकरिता महामंडळाचे जिल्हा समन्वयक वैभव मुंडे यांची उपस्थिती लाभली.

Post a Comment

0 Comments