प्रतिनिधी जळगाव जामोद 3 डिसेंबर जागतिक अपंग दिवस जळगाव जामोद येथे संग्रामपूर व जळगाव जामोद या दोन्ही तालुक्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने पंचायत समिती जळगाव जामोद येथे जागतिक अपंग दिवस साजरा करण्यासाठी आले होते.या कार्यक्रमाचे प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष नारायण महाले, ज्येष्ठ कार्यकर्ते तेजराव पाटील, आदिवासी जयस संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोपान सोळुंके उपस्थित होते या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना शासनापासून मिळणारे योजना त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे याकरिता दिव्यांग बांधवांमध्ये जनजागृती करण्यात येतील, दिव्यांग बांधवांना भीक नको मदत हवी जर दिव्यांग बांधवांना शासनाकडून योजने मार्फत आर्थिक मदत मिळाल्यास दिव्यांग बांधवा हा स्वालंबी होऊ शकतो असे आपल्या भाषणातून विचार प्रकट केले तसेच दिव्यांग बांधवांना पुढे आणण्यासाठी शासनाचे विविध उपक्रम तालुका मध्ये राबवण्यात येथील असे अध्यक्ष भाषणांमधून बोलताना सांगितले
कार्यक्रम चालू असतानाच अपंगाचे कैवारी प्रहार चे संस्थापक मा. बच्चुभाऊ कडू यांनी भ्रमणध्वनी द्वारे सर्व दिव्यांग बांधवांना जागतिक अपंग दिनाच्या शुभेच्छा दिल्या व दिव्यांगासाठी लढा अधिक मजबूत करून दिव्यांगाना स्वावलंबन बनवू, आजच्या दिवशी दिव्यांग बांधवांकरिता मंत्रालयाची स्थापना करण्यात आली या मंत्रालयामार्फत सर्व दिव्यांगांना घरकुल, निराधार योजना व इतर योजना पोचविण्यात येतील असे बच्चू भाऊंनी सांगितले
या कार्यक्रमात दोन्ही तालुक्यातील हजाराचे संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक सरदार ज. अवासे यांनी केले
0 Comments