जळगांव जामोद:-दिनांक १८ डिसेंबर २०२३ रोजी त्रिमूर्ती कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आसलगाव बाजार चे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर धानोरा महासिद्ध जिल्हा परिषद शाळा धानोरा येथे थाटात उद्घाटन संपन्न झाले
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष यु बी धुंदाळे साहेब उद्घाटक म्हणून प्रमुख उपस्थित आदरणीय फंड साहेब गटशिक्षणाधिकारी विशेष निमंत्रित प्राध्यापक नानासाहेब कांडलकर तसेच जिल्हा परिषद शाळा धानोरा चे मुख्याध्यापक जोशी सर सरपंच अनिताताई पैसोडे शाळा समिती अध्यक्ष कल्पनाताई खुपासे ,पोलीस पाटील संघपाल अवचार उपसरपंच विनायक चंदनकार , प्राचार्य इंगळे मॅडम ,ठोंबरे सर ,धांडे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाला आपल्या मार्गदर्शनात प्राध्यापक कांडलकर सर यांनी विद्यार्थ्यांना श्रमसंस्काराचे मूल्य व्यवस्थित समजावून सांगितले मानवी जीवनामध्ये संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नसते असा मोलाचा संदेश त्यांनी आपल्या मार्गदर्शनात दिला. या कार्यक्रमाला सर्व कर्मचारी वर्ग व स्वयंसेवक उपस्थित होते.
0 Comments