Advertisement

जळगाव जामोद येथील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी वडगाव पाटण येथे माती परीक्षण केले

जळगाव जामोद येथील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी वडगाव पाटण येथे माती परीक्षण केले 
प्रतिनिधी जळगाव जामोद दिनांक:२०/९/२०२३
जळगाव जामोद: तालुक्यातील वडगाव पाटण येथे स्वातंत्रविर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालयातील बि. एससी.(ऑनर्स) उद्यानविद्या अंतिम वर्षातील विद्यार्थिनींनी‘रावे’ (ग्रामीण उद्यानविद्या कायार्नुभव) वडगाव पाटण येथील एका शेतात माती परीक्षण करण्यात आले. गावकरी मंडळी व उद्यानविद्या महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तेथील शेतकरी बांधवांना माती परीक्षणाचे फायदे सांगितले व आपले विचार व्यक्त केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेरणा भंसाली ,पायल बोडखे,प्रगती चोपडे, पुजा हागे, गायत्री इंगळे, पुजा जगताप, निकिता जंजाळ, श्रुतिका कांबळे व विद्या लोथे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला गावातील शेतकरी व ग्रामस्थांची उपस्थिती होती. ग्रामीण उद्यानविद्या कायार्नुभव अंतर्गत या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल तायडे, उपप्राचार्य प्रा. सतिश धर्माळ, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रितेश वानखडे व विषय विशेषज्ञ प्रा. आकाश सुने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments