Advertisement

वर वधू परिचय मेळाव्यासाठी नाव नोंदणी करा,,,,,

वर वधू परिचय मेळाव्यासाठी नाव नोंदणी करा,,,,,
     
प्रतिनिधी जळगाव जा :- १० डिसेंबर रोजी जळगाव जामोद येथील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाच्या प्रांगणात होत असलेल्या भव्य बौद्ध धम्म परिषदेच्या दिवशी बौद्ध धंम्मातील वर वधू परिचय मेळाव्यासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन धंम्म सासन उपवर दारक दारिका परिचय पुस्तीक समितीचे संकलन प्रमुख,प्रकाशक पंडित गवई यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.धकाधकीच्या या जीवनात जो तो आपापल्या कामात व्यस्त झाला आहे.सोयरिक संबंधासाठी मुलांकडे असो वा मुलीकडचे असो दोघांनाही फार फिरावं लागतं आहे.नेमका हाच धागा पकडून समाजातील सोयरिक संबंधासाठी सोयीस्कर व्हावं यासाठी अशाप्रकारचे वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन व्हायलाच पाहिजे.त्यासाठी बौद्ध समाजातील उपवर मुला मुलींच्या सोयरिक संबंधासाठी नाव नोंदणी करण्यात येणार आहे.धम्म परिषद होत असलेल्या ठिकाणी उपवर दारक दारिका परिचय पुस्तीक समितीच्या वतीने स्वतंत्र स्टाॅल उभारण्यात येणार आहे.तेथेच नाव नोंदणी करावी असे सुद्धा प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments