Advertisement

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जळगाव जा येथे भव्य धंम्म परिषदेचे आयोजन

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जळगाव जा येथे भव्य धंम्म परिषदेचे आयोजन
प्रतिनिधी जळगाव जामोद 
येथे भव्य धंम्म परिषदेचे आयोजन जळगाव जा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जळगाव जामोद येथील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाच्या प्रांगणात १० डिसेंबर रोजी भव्य बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.धम्म परिषदेसाठी प्रमुख मार्गदर्शक तथा उदघाटक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ.भिमराव यशवंत आंबेडकर,पुज्य भंते ए.सुमेधबोधी राहणार आहेत.सकाळी ध्वजारोहण उदघाटन व समता सैनिक दलाची मानवंदना होईल तसेच ठिक १२ वाजता भिमनगर जळगाव जामोद येथून मिरवणूक सुद्धा निघणार आहे.
   यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आद.एस.एस.वले सर, जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय बौद्ध महासभा बुलढाणा उत्तर, मुख्य अतिथी म्हणून आदरणीय जयसिंग बौद्ध, जगदीश गवई (राष्ट्रीय उपाध्यक्ष)आद. भिकाजी कांबळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.के. हिवराडे, जिल्हा सरचिटणीस, प्रस्ताविक के.के शेगोकार जिल्हा कोषाध्यक्ष, तर आभार प्रदर्शन सुरेश गव्हांदे जिल्हा उपाध्यक्ष (संस्कार विभाग)करतील.
    धंम्म परिषदेसाठी मोठ्या प्रमाणावर बौद्ध बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष जगदीश हातेकर यांनी केले.

Post a Comment

0 Comments