Advertisement

होली फेथ इंग्लिश प्राइमरी स्कूल येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन संपन्न

होली फेथ इंग्लिश प्राइमरी स्कूल येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन संपन्न
 प्रतिनिधी हिवरखेड बाळासाहेब नेरकर
होली फेथ इंग्लिश प्राइमरी स्कूल मध्ये संत गाडगे महाराज पुण्यतिथी या दिनाच्या औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनी व टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविण्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला कार्यक्रमाचे अध्यक्ष हिवरखेड गावचे पोलीस पाटील प्रकाशजी गावंडे यांनी प्रथम संत गाडगेबाबा यांच्या फोटो चे पूजन करून
विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन केले व कार्यक्रमाला निरीक्षक म्हणून लाभलेले सहदेवराव भोपळे विद्यालयाचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक श्री संतोष कुमार राऊत सर यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या मॉडेलचे निरीक्षण करून
विद्यार्थी यांचे कौतुक केले तसेच कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सत्यदेव गिऱ्हे दादासाहेब देशमुख गौतम इंगळे सर डॉक्टर प्रशांत जी इंगळे जगन्नाथजी महाकाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते . सर्वांनी मुलांचे कौतुक केले त्यानंतर डॉक्टर इंगळे सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले राऊत सर यांनी सुद्धा मुलांना चांगले मार्गदर्शन केले गाडगे महाराजांनी सांगितलेल्या दशसूत्री चे संदेश दिले. गाडगे महाराज यांच्या विज्ञान दृष्टिकोन ठेवून हा कार्यक्रम सादर करण्यातआला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ.कल्पना सुनिल अस्वार मॅडम यांनी केले तर संचालन सोनुबाई कुऱ्हाडे यांनी केले तसेच आभार ममता इंगळे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रिया वालचाळे मॅडम शितल अग्रवाल मॅडम सीमा सोनवणे मॅडम शितल वानखडे मॅडम शितल रेखाते मॅडम शितल शेळके मॅडम, कुमुदिनीताई डेंगेकर प्रतिभाताई वायकर राजाराम भाऊ इंगळे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments