Advertisement

लोखंडा पंचक्रोशी जिगाव प्रकल्पा अंतर्गत सिंचन क्षेत्रात सामावून घेण्यासाठी जिल्हाधिकारी व आमदार फुंडकर यांच्याकडे विठ्ठलराव लोखंडकार यांची मागणी

लोखंडा व पंचक्रोशी जिगाव प्रकल्पा अंतर्गत सिंचन क्षेत्रात सामावून घेण्यासाठी मा. जिल्हाधिकारी किरण पाटील व आमदार आकाश फुंडकर यांच्याकडे विठ्ठलराव लोखंडकार यांची मागणी
खामगाव प्रतिनिधी 
जिल्हाधिकारी  किरण पाटील साहेब यांचे बाबुराव शेठ लोखंडकार यांच्या निवासस्थानी लोखंडा येथे सदिच्छा भेट ह्यावेळी खामगाव विधानसभे चे लोकप्रिय आमदार आकाश फुंडकर हे प्रमुख उपस्थित होते  बाबुरावशेठ लोखंडकार यांनी दोन्ही मान्यवर यांचे स्वागत केले तसेच शिवशंकर लोखंडकार अध्यक्ष खरेदी विक्री संस्था खामगाव व मनसेचे राज्य उपाध्यक्ष विठ्ठलराव लोखंडकार ग्रामपंचायतचे सदस्य प्रतीक जी लोखंडकार यांनी लोखंडकार परिवाराच्या वतीने अतुल पाटोळे तहसीलदार साहेब व ग्राम विकास अधिकारी  चंदनसिंह राजपूत अभय  कुलकर्णी हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार  कैलास चौधरी मान्यवरांना शाल श्रीफळ बुके देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला यावेळी विठ्ठल रावजी लोखंडकार यांनी परीसरातील प्रमुख समस्याकडे लक्ष केंद्रित केले जिगाव प्रकल्पाचे पाणी लोखंडा व आजूबाजूच्या पंचक्रोशीत आले पाहिजे आमच्या परिसरात सहा ते सात गाव सगळीकडूनच पाण्यापासून वंचित आहेत म्हणून जिल्ह्याचे पालक म्हणून आपण आहात या परिसरातील सर्व ग्रामपंचायतचे ठराव माननीय आमदार साहेबांच्या मार्फत आपणाकडे घेऊन येऊ व आपण जिगाव प्रकल्पाचे अधिक्षक इंजिनिअर श्रीराम हजारे यांच्यासमवेत बैठक लावून वंचित गावांचा समावेश ओलीतााली क्षेत्र घेन्यात यावे वचीत क्षेत्राला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून बैठक व्हावी अशी विनंती केली आहे परिसरातील 
घारोड. निरोळ .लोखंडा .शिराळा. पाळा. नाय देवी.उंबरा अकोली खेर्डी जळका तेली किन्ही महादेव नागापुर गणेशपुर वझर झोडगा परिसर जिगाव प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी या गावांना मिळावे करिता  आमदार महोदयांच्या मार्गदर्शनात पंचक्रोशी च्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे विशेष बाब म्हणून लक्ष देण्यासंदर्भात आग्रही विनंती केली गावाच्या सरपंच सौ दुर्गाताई ठाकरे उपसरपंच  सुरज हिवराडे  विलास भागवत  सिद्धार्थ हिवराळे सौ पूजा प्रमोद पुंडे सौ रेखाताई विनोद पाटोळे प्रतिष्ठित श्रीकृष्ण ठाकरे नागरिक गोविंदराव आटोळे गजानन वानखेडे  विनोद तांबडे  अनिल लोखंडकार  शाम टिकार  राम कृष्ण लोखंडकर  दत्तू  मदन गाढवे  निखिल वानखेडे लोखंडकार  नितीन देशमुख  नारायण खेडेकर तलाठी  खरात साहेब ग्रामसेवक  सागर जाधव.सदाभाऊ मडावी ईतर मान्यवर उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला

Post a Comment

0 Comments