Advertisement

पत्रकार बांधवांच्या वतीने विस्तार अधिकारी संदीपकुमार मोरे यांचा सत्कार

जळगाव जामोद पत्रकार बांधवांच्या वतीने विस्तार अधिकारी संदीपकुमार मोरे यांचा सत्कार
प्रतिनिधी जळगाव जा :- पुण्याच्या ग्लोबल स्काॅलर फाउंडेशन कडून राज्यस्तरीय भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल जळगाव जामोद पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीपकुमार मोरे यांचे जळगाव जामोद पत्रकार बांधवांच्या वतीने १६ जानेवारी रोजी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
   पुणे यशोदा येथे ७ जानेवारीला पद्मश्री पुरस्कार प्राप्त सुधाकर ओळवे यांचे हस्ते पुणे येथे सपत्नीक सन्मान चिन्ह देवून सन्मानित करण्यात आले आहे.
    संदिप मोरे हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी असून त्यांनी कोरोना काळात सामाजिक भान जपत रक्तदान शिबिरे, गरजवंताना अन्नदान केले आहे.१५२५ लोकांना जागा शासकीय धोरणानुसार उपलब्ध करून देवून लाभार्थ्यांना घरकुल मिळवून दिले आहे.आपल्या कर्तव्यप्रती जागृत राहून त्यांनी अनेक सामाजिक कार्यात महत्त्वाचं योगदान दिलं आहे.
   त्यामुळे जळगाव जामोद पत्रकार बांधवांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष गुलाबराव इंगळे, जयदेव वानखडे,सागर झनके,नागेश भटकर, विनोद वानखडे निलेश वानखडे,आणि सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहणारे मुरलीधर पाटील हजर होते

Post a Comment

0 Comments