प्रतिनिधी नागेश सुरंगे
प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष यश सुरेश संचेती यांच्या माध्यमातून युवकांसाठी गणपतीनगर येथील चैनसुख संचेती यांच्या निवासस्थानी रोजगार मेळावा घेण्यात आला. मेळाव्यातून दोनशेहून अधिक युवकांना रोजगाराची संधी मिळाली.मेळाव्यातून नियुक्ती झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय विमा पीएफ व नोकरीच्या ठिकाणी राहण्यासह जेवणाची व्यवस्था कंपनीकडून करण्यात येणार आहे.मलकापूरमधील युवकांनी मोठ्या संख्येने रोजगार मेळाव्याला उपस्थिती दर्शवली. यापैकी अनेकांच्या हाताला रोजगार मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आयोजनासाठी घेतलेल्या परिश्रमांचे सार्थक झाल्यासारखे वाटल्याचे यावेळी सांगण्यात आले.अकुशल कामगार रोजगार मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैनसुख संचेती यांनी भूषविले. तसेच शंकरकाका पाटील, शिवराज जाधव, ब्रह्मानंद चौधरी, प्रवीण पाटील, निखिलेश झंवर, दिनेश राऊत, निंबाजी सोनोने, मयूर बघे, नीलेश जैस्वाल, सनी तेलंग उपस्थित होते.
0 Comments