प्रतिनिधी जळगाव जामोद
जळगाव जामोद तालुक्यातील येनगाव येथील रहिवासी असणारे आशिष वायझोडे यांनी पक्षात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया फ्रंटच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व सोशल मीडिया फ्रंटचे अध्यक्ष महादेव बालगुडे, सहअध्यक्ष मोहसीन शेख यांच्या आदेशाने त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय पक्षाने दिला, याविषयीचे नियुक्तीपत्र त्यांना प्रदेशाध्यक्ष महादेव बालगुडे यांनी मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केले. प्रसेनजीत पाटिल यांचे निकटवर्तीय असलेले आशिष वायझोडे राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून नियुक्ती बद्दल त्यांनी पक्षाचे सर्व वरिष्ठ मंडळी तथा पक्षाचे नेते प्रसेनजीत पाटिल यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.तसेच पक्ष वाढीसाठी व शरदचंद्र पवार साहेब यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवीण्यासाठी कठीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments