Advertisement

जळगाव जामोद तालुक्यात चोरट्या मार्गाने अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून वाहतूक महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष...

जळगाव जामोद तालुक्यात चोरट्या मार्गाने अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून वाहतूक महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष...

जळगाव जा: प्रतिनिधी
 जळगाव जामोद तालुक्यातील व परिसरात अवैध गौण खनिज माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मात्र, महसूल विभाग या प्रकाराबाबत फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जळगाव तालुक्यात अवैध गौण खनिज माफियांचा सुळसुळाट झाला असून, अवैध गौण खनिज उत्खनन अन् वाहतूक संपूर्ण रात्रभर चालू असते.माऊली गोळेगाव,घाट पळशी, दादुलगाव, मडाखेड, पूर्णा अशी अनेक नद्या मधून अवैध वाळूचा बेबंद उपसा चालू आहे. गौण खनिजाचे उत्खनन होत असताना महसूल अधिकारी, कर्मचारी कारवाई करीत नाहीत, हे विशेष माऊली गोळेगाव,घाट पळशी, दादुलगाव, मडाखेड, पूर्णा नदी, पात्रातून वाळू,मुरूम, माती मोठ्या प्रमाणात उचलण्यात आली आहे. जळगाव तालुक्यात मुरूमाचे उत्खनन सर्रासपणे चालू आहे. गौण खनिज माफियांची मोठी टोळी या परिसरात आहे महसूल प्रशासन अॅक्शन मोडवर येऊन संबंधित अवैध गौण खनिज माफियांवर कारवाई करणार का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
 जळगाव जामोद तालुक्यात व परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुक चालूच आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडाला आहे महसूल विभागाने अॅक्शन मोडवर घेऊन कडक कारवाई करण्याची गरज आहे.

चौकशीचा फार्स नको

 जळगाव परिसरातील गौण खनिजाच्या उत्खननाची प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच या प्रकरणी दोषी अधिकारी व कर्मचान्यांवर कारवाई झाली पाहिजे चौकशीचा फार्स न करता दोषीवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.. विभाग कारवाई करीत नसल्याने यामागचे गौडबंगाल काय आहे, हे समोर आल्याशिवाय हा प्रकार थांबणार नाही.

Post a Comment

0 Comments