Advertisement

सातपुडा शिक्षण संस्था तर्फे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

सातपुडा शिक्षण संस्था तर्फे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
प्रतिनिधी जळगाव जामोद
सातपुडा शिक्षण संस्था, जळगांव जामोद तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला संलग्नित स्वातंत्र्यविर गणपतराव इंगळे कृषि महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि उद्यानविद्या महाविद्यालय तसेच शरद पवार कृषि तंत्र विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.22/01/2024 रोजी *स्नेहसंमेलन (विजयी भव: Born to Win 2024)* उत्साहात साजरे करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मा.श्री.कृष्णरावजी इंगळे (संस्थापक अध्यक्ष, सातपुडा शिक्षण संस्था) यांच्या वाढदिवसानिमित्त *सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव* साजरा केला जात आहे, महोत्सवाचाच एक भाग म्हणून स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

स्नेहसंमेलनाचे उद्घाटन थाटात संपन्न झाले, उद्घाटनप्रसंगी सातपुडा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.कृष्णरावजी इंगळे, सातपुडा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.हरिभाऊजी इंगळे, सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.शेषरावजी भोपळे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नितीनजी सातव तसेच कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश गवई, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.राहुल तायडे, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विशाल तायडे व शरद पवार कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य प्रा.निलेश मवाळ उपस्थित होते. स्नेहसंमेलनाचे उद्घाटनप्रसंगी प्रास्ताविक प्रा.योगेश गवई यांनी केले तर आपल्या अध्यक्षीय भाषणात मा.श्री.कृष्णरावजी इंगळे यांनी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना कसा वाव मिळेल यासाठी मी सदैव आशादायी आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना उच्चप्रतीचे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी मी सदैवच प्रोत्साहन देतो. आपल्या संस्थेमधील प्रत्येक विदयार्थी हा एक रुपयाच्या नाण्यासारखा असला पाहिजे की जो कुठल्याही क्षेत्रामध्ये उतरल्यावर तो वाजलाच पाहिजे.

स्नेहसंमेलनामध्ये सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या नृत्यकलेचे व इतर सांस्कृतिक कलेचे उत्कृष्ट सादरीकरण केले आणि सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. विशेष म्हणजे मा.श्री.कृष्णरावजी इंगळे यांनी सुद्धा संपूर्ण स्नेहसंमेलनाचा आनंदाने आस्वाद घेतला.

स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी तिन्ही महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी, कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत घेतली. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम समितीच्या सर्वच सदस्यांनी मागील काही दिवसांपासून कार्यक्रम उत्कृष्टपणे सादर होण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments