प्रतिनिधी जळगाव जामोद
बापुमिया सिराजोद्दीन पटेल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव काळे येथील शारीरिक शिक्षण संचालक प्रा डॉ बाबाराव सांगळे यांनी दिनांक 29 ते 31 डिसेंबर दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय मास्टर्स ॲथलेटिक्स चालण्याच्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविले.
ही स्पर्धा मीनाताई ठाकरे स्टेडियम पंचवटी नाशिक येथे पार पडली.
पाच किलोमीटर चालण्याची ही स्पर्धा प्रा सांगळे यांनी 31 मिनिटात पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळविला व बापुमिया सिराजोद्दीन पटेल महाविद्यालय पिंपळगाव काळे यांचे नाव राज्यस्तरावर झळकविले. त्यांची निवड पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली आहे.
डॉ बाबाराव सांगळे यांच्या यशाचे कौतुक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड सलीम पटेल, सहसचिव रब्बानी देशमुख, उपाध्यक्ष तथा प्रा कय्यूम पटेल ,संचालक सिराजोद्दीन पटेल प्राचार्य डॉ शेख फराह, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य एम बी इंगळे ,पळशी येथील उपसरपंच निलेश भोपळे, रमेश तूरूक, प्रा मोहम्मद शोएब प्रा अतुल उगले, प्रा नूर मोहम्मद ,प्रा एस ए काजी, प्रा चेतन पलन प्रा महेश नेतनासकर , डॉ निखिल अग्रवाल, डॉ ए एस जाधव प्रा नितीन असोले ,प्रा मनोहर जांभळे, प्रा शकील खान प्रा पी एन बाठे, डॉ दिपाली शिरसाट,
गजानन इंगळे,डॉ गजानन भोपळे,मो मुसअब ,शेख अफरोज ,परेश अवचार, सागर खांदे ,अमोल देवकर , विशाल दाणे, सागर बहादरे , अमीरउल्ला खान, साजिद देशमुख, वसीम देशमुख, आशिष इंगळे ,जुबेर खान, शेख जुबेर, मुद्दसिक पवार,अक्षय तायडे
0 Comments