सकारात्मक लेखी अश्वासनाने गुराढोरांसह गावकऱ्यांचे आमरण उपोषणाची सांगता
पिंपळगांव काळे:- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पिंपळगांव काळे गावकरी, शेतकरी,शेतमजूर तरुण युवक वयोवृद्ध नागरिक तसेच गुराराढोरांसह आमरण उपोषण सारथी फाउंडेशन अध्यक्ष प्रकाश विठ्ठलराव भिसे यांच्या नेतृत्वात 25 जानेवारी रोजी पासून सुरू करण्यात आले होते अखेर 26 जानेवारीच्या रात्री उशिरा उपोषनातील मुख्य मागण्या मान्य झाल्या व काही मुद्द्यांच्या चर्चेअंती त्यांवर तोडगा काढला. या मध्ये पिकविमा संदर्भात मुद्दे असून येत्या फेब्रुवारीच्या अंती 22 जुलै व 27 नोव्हेंम्बर रोजी अतिवृत्तीमूळे नुकसान झालेल्याना मदत मिळणार, शेतकऱ्यांनी कृषी विभागाला ऑफलाईन केलेल्या तक्रारीचे काय झाले याची चौकशी करून तक्रारी ग्राहय धरू असे चर्चे वेळी सांगितले, पशु वैद्यकीय दवाखान्यात थोड्या दिवसातच डॉक्टर उपलब्ध होणार असे लेखी पत्र संबंधित अधिकारी यांनी दिले, महापुराने खचलेल्या विहीरी प्रधान्याने दुरुस्ती करा या संदर्भात सर्व तलाठी यांना विहिरीचे सर्वे करण्यासाठी तहसीलदार यांनी पत्र पाठवले आहे, ज.जा तालुक्यातील 5196 तक्रारी विमा कंपनीने का नाकारल्या याचा संपूर्ण डेटा विमा जिल्हा प्रतिनिधी व ता प्रतिनिधी आम्हाला देणार आहेत व पात्र तक्रारी ग्राह्य धरून त्यांना विमा देणार हेही त्या वेळी सांगितले. शेतकऱ्यांना रात्रीची वीज कमी करून दिवस 8 तास वीज उपलब्ध कशी देता येणार याचा लवकरच शेड्युल तयार करून वरिष्ठांकडून परवानगी घेऊ असे कार्यकारी अभियंता तायडे साहेब यांनी चर्चे केली व लेखी दिले. तसेच शेतकऱ्यांच्या अन्य समस्या सुद्धा उपोषण मंडपात स्पॉटवरच सोडवल्या. आमरण उपोषणातील उपोषणकर्ते सारथी फाउंडेशन अध्यक्ष प्रकाश भिसे शेतकरी नेते अनिल भोपळे, सामाजिक कार्यकर्ते सुपडा मानकर, रमेश ढोले, यांना जूस देऊन उपोषण सोडले, त्या वेळी कृषी अधिकारी धिरज वाकोडे, ठाणेदार महाजन साहेब, ना.तहसिलदार मार्कंडे साहेब, कनिष्ठ अभियंता सहस्त्रबुद्धे, पशु डॉ.तळोकार, पटवारी मेजर विजय मोहाटे व सुधाकर घटे, फिरोज खान, गणेश इंगळे, श्रीराम भिडे, प्रविण चिपडे, स्वप्निल भोरे, गजानन चोखंडे, बबलू रायने, हरिदास वाघमारे, मुरली फंड, संजय टापरे, रमेश बैरागी, पुरुषोत्तम बहादरे, भगवान पारस्कार, पंकज शेट्टे, मनोज जाधव, विशाल टापरे भास्कर वाघमारे, गजानन जळके, प्रशांत जाधव, ज्ञानेश्वर चोखंडे, गणेश बोदडे, बाळू जवंजाळ, शुभम पाटील, भगवान ढगे, समाधान मांडोकार, श्रीराम ईनकर, गुलाब पाटील, सशामराव ढोले, समाधान कोल्हे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपोषणाअंती प्रकाश भिसे यांनी शेतकऱ्यांचे व गावकऱ्यांचे आभार मानले.
0 Comments