पत्रकाराला धक्काबुक्की करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून निलंबनाची मागणी...
अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारांचा मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून इशारा...
- पुणे गोखलेनगर येथे आंदोलनाचे वृत्तांकन करणाऱ्या पुढारी न्युज चॅनलचे पुणे येथील रिपोर्टर ज्ञानेश्वर चौतमल यांना पोलिसांनी धक्काबुक्की करत त्यांच्याकडील कॅमेरा आणि मोबाईल हिसकावून घेत कारवाईची धमकी दिली, पत्रकारांशी अश्लाघ्य वर्तन करत पोलिसांनी मुजोर वर्तन केले, कॅमेरामनला फरफटत नेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसवले, आणि कॅमेरामधील कार्ड काढून घेतल्याची निषेधार्ह घटना घडली आहे, एक प्रकारे माध्यमांचा गळा घोटण्याचा हा प्रकार आहे, या घटनेचा बुलढाणा जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमातील सर्व पत्रकारांच्या वतीने निषेध करत, पत्रकाराला धक्काबुक्की करून असभ्य वर्तन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारांनी केली आहे, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिले आहे, संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय, यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमाचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते...
0 Comments