Advertisement

बारी युवा बहुउद्देशीय व क्रीडा संस्थेचा स्नेहमेळावा व सत्कार सोहळा संपन्न

बारी युवा बहुउद्देशीय व क्रीडा संस्थेचा स्नेहमेळावा व सत्कार सोहळा संपन्न
बाळासाहेब नेरकर कडुन
अकोला स्थानिक बारी युवा बहुउद्देशीय संस्थेच्या पुढाकाराने रविवार दि. २८ जानेवारी रोजी येथील आबासाहेब खेडकर सभागृहात समाज बांधवांचा स्नेह मेळावा व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे उदघाटक व पूजन वंचित बहुजन आघाडीच्या प्रा. सौ.अंजलीताई आंबेडकर यांनी केले. 
 कार्यक्रमाच्या अध्य़क्षस्थानी कृषीभूषण विजय लाडोळे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. अमोल मिटकरी, मा.आ.गोपिकिशन बाजोरीया, सुभाष माकोडे, सुभाष लटकुटे,प्रा.धैर्यवर्धन फुंडकर, मा.जि.प.उपाध्यक्ष सुभाष रोंदळे, मनोहर ताळे,धिरज सातपुते, प्रा. संजय बोडखे, राजेश येऊल, ज्ञानेश्वर सुलताने, शंकरराव इंगळे,बालमुकुंद भिरड ,मधुकर पोके,,अॅड.संतोष राहटे, योगेश बुंदेले,रवि देशमाने, देविदास येऊल, प्रा.रवींद्र भास्कर, डॉ.पांडुरंग धांडे,योगेश हिस्सल, विलास पेटले, सुरेश दुधे, सौ.वर्षा बोडखे,सह प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
बारी समाज वार्षिक स्नेहमिलन सोहळ्याच्या निमित्ताने समाज बांधवांसाठी आरोग्य तपासणी, सांस्कृतिक कार्यक्रम, गुणवंत, सेवानिवृत्तांचा सत्कार तसेच महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
सदर स्नेह मिळावा यशस्वी करण्यासाठी बारी युवा बहुउद्देशी व क्रीडा संस्था अकोला चे अध्यक्ष गोपाल नागपूरे उपाध्यक्ष सुभाषभाऊ रोंदळे उपाध्यक्ष सौ कुसूम रेखाते,सचिव पद्माकर रोंदळे,सहसचिव अमोल धर्मे, किशोर राऊत,डिगांबर सांगळे, वसंत धर्मे, प्रकाश नानकदे, महेन्द्र उमरकर, डॉ. गजानन ईखार अॅड.श्रीकृष्ण अरबाड, संतोष हागे सह अकोला शहर व जिल्ह्यातील बारी समाज बांधव उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments