जळगांव जा. प्रतिनिधी:-
जळगाव जामोद शहरातील एकता नगर येथे दिनांक 7 फेब्रुवारी रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचरणी त्यागमूर्ती माता रमाई यांची 126 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सदर जयंती कार्यक्रमाचे आयोजन एकता नगर व उदय कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुनीता हेलोडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन महिला आघाडीच्या पार्वताबाई इंगळे, विशाखाताई सावंग, छायाताई बांगर, प्रीतीताई शेगोकार, शिल्पाताई ठाकरे सुमनबाई थाटे रूपालीताई तायडे यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अरुण पारवे, मंगलाताई पारवे सुनील बोदडे, देवानंद दामोदर उपस्थित होते त्यावेळी सर्वप्रथम त्यागमूर्ती माता रमाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात पंचशीलेने करण्यात आली. यावेळी तालुक्यातील ज्येष्ठ महिलांचे शाल व त्यागमूर्ती माता रमाई यांचा फोटो देत सत्कार करण्यात आला तसेच यावेळी अक्षय धन्दर यांनी एम पी एस सी परीक्षेत प्राविण्य मिळवल्याबद्दल शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला यासह राहुल वाकोडे यांनी आर्किटेक्चर परीक्षा पास केल्याबद्दल शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला. तसेच सदर कार्यक्रमात बौद्धिक ज्ञानावर आधारित विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा घेण्यात आली तसेच सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम व गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जळगाव जामोद शहरासह तालुक्यातील वंचित बहुजन महिला आघाडीच्या महिला कार्यकर्त्या यांच्यासह बहुसंख्य नागरिकांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.त्याग मूर्ती माता रमाई जयंती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगलाताई पारवे व मंदाताई भारसाकडे तर आभार प्रदर्शन पुष्पाताई इंगळे यांनी केले.
0 Comments