Advertisement

गाव तिथे शाखा घर तिथे मनसे सैनिक उपक्रम हाती घेऊन सर्वांनी एक जुटीने काम करावेः अमित देशमुख

गाव तिथे शाखा घर तिथे मनसे सैनिक उपक्रम हाती घेऊन सर्वांनी एक जुटीने काम करावेः अमित देशमुख
प्रतिनिधी नागेश सुरंगे
लोकसभा व येणाऱ्या निवडणुकांच्या नियोजनाच्या अनुषंगाने स्थानिक विश्राम गृह येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मलकापूर तालुका व शहर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन २८ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते.बुलडाणा जिल्हा संपर्क अध्यक्ष विठ्ठलभाऊ लोखंडकार यांचे मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या बैठकीप्रसंगी जिल्हाध्यक्ष अमित देशमुख, जिल्हाध्यक्ष (रस्ते साधन सुविधा) विनोद टिकार, जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील, तालुका अध्यक्ष पंकज पाटील यासह आदींची प्रामुख्याने उपसिथती होती.

यावेळी जिल्हाध्यक्ष अमित बाप्पू
देशमुख यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात गाव तिथे शाखा घर तिथे मनसे सैनिक हा उपक्रम हाती घेऊन पक्ष मजबुतीसाठी सर्वांनी एक जुटीने काम करावे. तसेच येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार उभा करून ताकदीनिशी निवडून आणण्याची जबाबदारी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांची असून त्याकरीता आतापासून सर्वांनी कामाला लागावे, असे रस्ते आस्थापना जिल्हाध्यक्ष विनोद टिकार यांनी सांगितले. तर यावेळी रस्ते आस्थापनाच्या नियुक्याही जाहीर केल्या .बैठकीला मनसे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, नानासाहेब बाबर, तालुका उपाध्यक्ष निखिल चिम, मनवीसे शहर अध्यक्ष निखिल पोंदे, गजराज सोळुंके शहर अध्यक्ष रस्ते आस्थापना, दुर्गेश ढोलकर शहर उपाध्यक्ष रस्ते आस्थापना, गणेश आकोटकर, भूषण सुरंगे, रितेश भोपळे, वैभव चोपडे, आकाश बोरसे, नितीन कदम, वैभव सुरडकर, आकाश सावडे, अभिषेक देसार, अंश श्रीवास्तव यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मलकापूर तालुका व शहरचे पदाधिकारी, मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments