Advertisement

कुऱ्हा महाविद्यालयातर्फे औद्योगिक भेटीचे यशस्वी आयोजन

कुऱ्हा महाविद्यालयातर्फे औद्योगिक भेटीचे यशस्वी आयोजन
प्रतिनिधी
कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कुऱ्हा काकोडा च्या वतीने विद्यार्थ्यांची एक दिवसीय शैक्षणिक व औद्योगिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीला संस्थेचे सचिव मा. भालचंद्रजी कुलकर्णी यांनी झेंडी दाखवली यावेळी प्रा. सचिन जोशी, प्रा. वाघ व अन्य कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. या सहलीत गजानन महाराज संस्थान, शेगाव, यश इंडस्ट्रीज, खामगाव, पुरोहित जिनिंग अँड ऑइल इंडस्ट्री, खामगाव, अजय इंडस्ट्रीज, खामगाव, SNG पॅकेजिंग pvt Ltd, खामगाव, समर्थ केमिकल्स, खामगाव, तिवारी प्लास्टिक इंडस्ट्रीज, राजस इंडस्ट्रीज, खामगाव, शिवांगी बेकर्स, खामगाव, पाटील स्टोन क्रशर्स, खामगाव, जागृती आश्रम, खामगाव, बालाजी मंदिर संस्थान, नांदुरा या सर्व ठिकाणी भेट दिली. या सहलीकरिता श्री. अमित सिंग राजपूत, श्री. राहुल पाटील, श्री. मयुरेश कुलकर्णी, श्री. प्रवीण ढोले, श्री. आशिष सर, श्री. पुरोहित जी, श्री. तिवारी जी, श्री. विनय देशपांडे जी या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले. या औद्योगिक भेट व सहलीकरिता प्रा. प्रणव दाते, प्रा. जितेश कुलकर्णी, प्रा. नयना सुरळकर, प्रा. भाग्यश्री ढगे, प्रा. कविता पर्वते, प्रा. वृषाली शिमरे, प्रा. साक्षी कुलकर्णी, प्रा. अमोल नाफडे, प्रा. गजानन पाटील, शुभम धाडे, गजानन बिलेवार यांनी विशेष प्रयत्न केले. Pears साबण, पार्ले जी बिस्कीट, ऑइल, सरकी ढेप, चटाई निर्मिती, केमिकल निर्मिती, प्लास्टिक रिसायकल इत्यादी गोष्टी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात पाहता आल्या.

Post a Comment

0 Comments