पुरग्रस्तांच्या न्यायासाठी वंचित चे एकदिवसीय धरणे आंदोलन
जळगांव (जामोद):- २२ जुलै २०२३ रोजी झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे दुकानाची व घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झाली होती परंतु आज आठ महिने उलटूनही कोणत्याही प्रकारची सानुग्रह मदत नुकसानग्रस्त दुकानदारांना व घरांची पडझड झालेल्या नागरिकांना भरीव मिळालेली नाही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त दुकानदारांना ५०००० रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे परंतु अद्यापही नुकसानग्रस्त दुकानदारांना मदत मिळालेली नाही. हा सरासर अन्याय या नुकसानग्रस्त नागरिकांवर होत आहे. म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसिल कार्यालय जळगांव (जामोद) येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले सदर आंदोलन हे पुरग्रस्तांच्या विविध मागण्या घेऊन करण्यात आले होते या आंदोलनात 22जुलै 2023रोजी झालेल्या ढगफुटीमुळे तालुक्यातील अनेक गावातील घरांची पडझड झाली होती. त्याची आर्थिक मदत गेल्या 8 महिन्यांपासून मिळालेली नाही, ती तत्काळ मिळावी, अनेक गावातील लहान मोठे उद्योग व्यवसाय करणारे दुकानदारांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्यावरही कुठलीच मदत शासनाने आजपर्यंत जाहीर केल्यावरही दिली नाही ती मदत तत्काळ मिळावी. ढगफुटीमुळे पुर्णतः घरांची पडझड झालेल्याना घरकुल योजनेचा लाभ तात्काळ द्यावा, २६ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचा हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या.
या मागण्या घेऊन दिनांक ०५ /०३/२०२३ रोजी तहसिल कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व नुकसानग्रस्त दुकानदार, घरांची पडझड झालेल्या नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करण्यात आले होते. तसेच या धरणे आंदोलनाला जळगांव जामोद तालुक्यातील नुकसानग्रस्त व्यावसायिक दुकानदारांनी पाठिंबा दिला या धरणे आंदोलनात वंचित बहुजन आघाडिचे जिल्हा महासचिव अनिल इखारे, जिल्हा संघटक अरुणभाऊ पारवे, माजी तालुका अध्यक्ष रतन नाईक, युवा नेते विजय पोहनकर, प्रकाश भिसे, तालुका उपाध्यक्ष सुनिल बोदडे, तालुका महासचिव विजय सातव, जेष्ठ नेते ईज्जत बेग ,तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोकाटे, संचालक प्रशांत अवसरमोल,महिला आघाडीच्या पार्वताबाई इंगळे,सुनिता हेलोडे, मंगलाताई पारवे, गजानन चोखंडे, सुपडा चोखंडे, रमेश बैरागी, दुर्योधन मांडोकार, मंगेश खंडारे, गुलाबराव आठवले,भास्कर भगत, गुलाब पाटील विजय तायडे, कैलास भगत, यांच्या सह पुरग्रस्त दुकानदार, टपरीधारक , शेतकरी व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments