महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे मागणी.
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर तालुक्यातील भाडगणी येथील प्रवासी निवारा बस थांब्यावर अतिक्रमण करून दुकान थाटणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करणे बाबतचे चे निवेदन सहाय्यक अभियंता श्रेणी -१ सार्वजनिक बांधकाम उपविभाग मलकापूर यांना मनसे तालुका अध्यक्ष पंकज पाटील यांच्या नेतृवात दि.१४ मार्च रोजी देण्यात आले.
मलकापूर तालुक्यातील भाडगणी येथील प्रवासी निवऱ्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून पडक्या अवस्थेत येथील प्रवासी निवरा सध्याच्या स्थितीत आहे.
मौजे. भाडगणी येथील प्रवासी निवऱ्यात अतिक्रमण करून दुकान टाकलेली आहे.प्रवासासाठी बस ची वाट पाहण्यासाठी नागरीकांना उन्हात उभे राहावे लागत आहे.याचा त्रास आबाल वृद्ध लहान मूल व महिला वर्गाला सहन करावा लागत असून शासना कडून असे निवारे हे नागरिकांना ऊन,पाऊस,तसेच नैसर्गिक आपत्ती पासून सुरक्षितता मिळावी या करिता बांधले आहे परंतु ग्राम भाडगणी येथे प्रवासी निवऱ्यातच दुकान थाटून दुकानदाराने दुकानदारी सुरू केली आहे तरी लवकरात लवकर सदर प्रवासी निवारा नागरिकांसाठी नव्याने बांधून स्वच्छ व साफ करून देण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली यावेळी मनसे तालुका अध्यक्ष पंकज पाटील,मनसे तालुका उपाध्यक्ष निखील चिम,रस्ते साधन सुविधा तालुका उपाध्यक्ष एकनाथ जाधव, रस्ते साधन सुविधा शहर अध्यक्ष गजराज साळुंके,मनविसे शहर अध्यक्ष निखील पोंदे,भूषण सुरंगे,रितेश भोपळे,हर्षल केणे,यांचे सह मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments