Advertisement

आरागिरीचे गेट बंद करून वेगवेगळ्या प्रकारचे ओल्या लाकडाची कटाई विरोधात

आरागिरीचे गेट बंद करून वेगवेगळ्या प्रकारचे ओल्या लाकडाची कटाई विरोधात

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याजवळ तरुणाने केली तक्रार..
जळगाव जामोद विनापरवाना ओला लाकूड कटाई व अडजात वृक्षाची अवैध वृक्षतोडीची चौकशी व कारवाई करण्याबाबत वन परिक्षेत्र अधिकारी यांच्याजवळ मागील 20 मार्च 2024 रोजी जळगाव जामोद येथील अकील शेख, शेख आहद या युवकाने तक्रार केली आहे तसेच तक्रारी मध्ये नमूद आहे की जळगाव जामोद बीट अंतर्गत येणाऱ्या आरा मशीन मध्ये मागील काही महिन्यापासून अवैध विनापरवाना कटाई होत असून त्यामध्ये आडजात, अंजन, कहू, लिंब, आंबा, चिंच यासारख्या वृक्षाची विनापरवाना मोठ्या प्रमाणात लक्ष्मीनारायण मिल आरा मशीन मध्ये मेन गेट बंद करून सर्रास कटाई केलेल्या मालाची विल्हेवाट लावण्यात येत आहे तर श्री लक्ष्मीनारायण स्वामिल वर विनापरवाना वेगवेगळ्या प्रकारचे वन वृक्ष तसेच आड 'जात गोल लाकडे आहे याबाबत वरिष्ठांनी लक्ष देऊन चौकशी तात्काळ करावी तसेच श्री लक्ष्मी नारायण स्वामिल आरा गिरणीचे रजिस्टरची सुद्धा नोंदणी नमूद बिना नोंदणीचे सर्व प्रकारच्या लाकडाची तपासणी वरिष्ठ वन अधिकारी यांनी करावी आणि वृक्षांची लाकडे कुठून आली त्याबाबत लेखी पुरावा सातबारा नोंद व खरेदी कागदपत्रे श्री स्वामील आरा गिरणी परवानाधारकाजवळ तपासणी करावी आणि सर्व स्टॉक रजिस्टर मध्ये असलेल्या मालाचे मोजमापन करून कार्यवाही करावी तरी वरील अवैध कटाई करणाऱ्या या श्री लक्ष्मीनारायण स्वामिल गिरणी वर योग्यती कार्यवाहीचा अहवाल तक्रार करता यांना देण्यात यावा अशा प्रकारची तक्रार शेख अकींल शेख आहद यांनी जळगाव जामोद वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयावर दिली असून त्या मिलवर कोणत्या प्रकारची कारवाई करतील हे पाहायला मिळाले मिळेल.

Post a Comment

0 Comments