सालाबादप्रमाणे प्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता मेळावा शिवाजी पार्क मुंबई येथे आयोजित केला आहे तरी सर्व महाराष्ट्र सैनिक मराठी युवकांनी मा. राजसाहेब ठाकरे यांचे विचार एकण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मनसे शहर अध्यक्ष नागेश भटकर यांनि केले आहे...... राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष अमित बाप्पू देशमुख यांच्या सूचनेवरून जळगांव जामोद तालुक्यातील सर्व मनसे सैनिक कार्यकर्ते पदाधिकारी तसेच सर्व मराठी माणसांनी गुढीपाडवा येत्या 9 एप्रिल रोजी शिवाजी पार्क येथे होणाऱ्या यांच्या सभेमध्ये राज साहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी तसेच महाराष्ट्र मधील घडणाऱ्या या गलिच्छ राजकारणा मधून बाहेर पडून आपला महाराष्ट्र धर्म कसा वाढवावा व मराठी माणूस आपल्या हक्कासाठी कशाप्रकारे लढावे राज साहेब ठाकरे आपल्या भूमिका मांडणार आहेत तसेच सर्व मनसे सैनिकांना तिथूनच आदेश देऊन कोणत्या प्रकारे काम करावे यासाठी आदेश देणार आहेत तरी तालुक्यातील सर्व मनसे सैनिक पद्धती व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने शिवाजी पार्क येथे उपस्थित रहावे असे आवाहन मनसेचे जळगांव जामोद शहर अध्यक्ष नागेश भटकर यांनी केले आहे
0 Comments