जळगाव ठाणेदाराचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ड्राय डे च्या दिवशीही खुलेआम सुरू होता बियर बार केली राज्य उत्पादन शुल्काने धडक कारवाई...
जळगाव जामोद प्रतिनिधी
कधी काळी महाराष्ट्र शासनाची दूध महापूर योजना अस्तित्वात होती. तशाच प्रकारची योजना सध्या जळगाव जामोद तालुक्यामध्ये "दारू महापूर योजना" म्हणून अस्तित्वात आहे. जळगाव (जामोद) तालुक्यामध्ये देशी विदेशी ची, अधिकृत वाईन बार, असताना सुद्धा ह्यापेक्षा शंभर पटीने अवैध इंग्लिश, देशी, विदेशी दारू दुकाने आहेत.रामनवमीच्या दिवशी देशी दारू दुकाने, बियर बार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही वाडी खुर्द येथील अशोका वाईन बार व गार्डन रेस्टॉरंट खुलेआम सुरू असल्याचे उत्पादन शुल्क, प्रशासन विभागाचे अधिकारी व्ही. एम. पाटील यांच्या आणि निदर्शनास आले व यांनी तात्काळ संबंधित बारवर धाड टाकून विदेशी मद्य चा साठा जप्त केला व संबंधित अशोका बार आणि गार्डन रेस्टॉरंट वर कठोर कारवाई केली. त्यामुळे अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे
0 Comments