Advertisement

सुनगाव येथे लोखंडी रॉडने मारहाण दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल

सुनगाव येथे लोखंडी रॉडने मारहाण दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल
प्रतिनिधी 
जळगाव जामोद दि 28: सुनगाव येथे जुन्या वादातून दोन व्यक्तींनी एका व्यक्तीला लोखंडी मारहाण केल्याची घटना दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास घडली. फिर्यादी सुवर्णसिंग विठ्ठल सिंग राजपूत राहणार सुनगाव हे गावातीलच अनिल राजपूत यांच्या पान टपरी जवळ उभी असताना आरोपी किशोर येऊल, विजय येऊल या दोघांनी फिर्यादी सुवर्ण सिंग राजपूत यांना जुण्या भांडणाच्या कारणावरुन एकदम शिवीगाळ करुन त्यांच्या हातात असलेल्या स्टिलच्या रॉडने दोघांनी फिर्यादी यांना जिवे मारण्याचे उददेशाने फिर्यादी यांचे दोन्ही पायावर, हातावर, डोक्याच्या मागचे बाजुला, कपाळावर मारुन गंभीर जखमी केले तसेच डाव्या हातावर व बोटावर मारून जखमी केले व फिर्यादी यांना आरोपीनी मारत असतांना ते एकमेकांना बोलत होते की, याला जिवाने मारुन टाकु असे बोलत होते. नंतर तेथे गावातील ज्वालासिंग कल्याणसिंग राजपुत व अनिल उदयसिंग राजपुत हे हजर आले व त्यांनी भांडण सोडविले. त्यानंतर गावातील प्रेमसिंग राजपुत यांनी फिर्यादी यांना त्यांचे गाडीत ग्रामिण रुग्णालय, जळगाव जामोद येथे उपचार कामी आणले व ग्रामीण रुग्णालयातच फिर्यादीची जबानी घेण्यात आली व त्यांच्या तक्रारीवरून आरोपीवर कलम 307 ,326, 504 ,506, 34 भारतीय दंड विधानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीला पुढील उपचारासाठी  खामगाव येथे रेफर करण्यात आले आहे पोलीस निरीक्षक महाजन यांच्या आदेशाने  सपोनि पी. आर. इंगळे हे पुढील तपास करीत आहे

Post a Comment

0 Comments