Advertisement

सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस फुस लावून पळविले.. सुनगाव येथील तरुणावर गुन्हा दाखल..

सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस फुस लावून पळविले.. सुनगाव येथील तरुणावर गुन्हा दाखल..
जळगांव जा.प्रतिनिधी:- 
तालुक्यातील एका गावातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस गावातीलच 24 वर्षीय तरुणाने फुस लावून पळवून नेल्याची घटना दिनांक 25 एप्रिल रोजी रात्री 8 च्या सुमारास घडली. मुलगी घरच्यांना संडासला जाते म्हणून घराच्या बाहेर पडली व ती रात्री उशिरापर्यंत घरी आली नाही म्हणून आई-वडिलांनी तिला शेजाऱ्यांच्या घरी व नातेवाईकांकडे शोधले परंतु ती मिळून आले नाही. नातेवाईकांसह मुलीचे पिता यांना सुनगावातील अमोल गजानन वसतकार हा पण घरी नसल्याचे समजले यावरून त्यांचा संशय पक्का झाला. यावेळी पळवून नेलेल्या मुलीच्या पित्याने सुनगाव येथील अमोल गजानन वसतकार याच्या विरोधात जळगाव जामोद पोलीस स्टेशनला जाऊन मुलीला फूस लावून पळविल्याची तक्रार दिली सदरच्या तक्रारीवरून पोलिसांनी अमोल वसतकार याच्या विरोधात अप नंबर 252/2024 कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनात स.पो.नि. पांडुरंग इंगळे करीत आहेत...

Post a Comment

0 Comments